वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठीची भारतातील घाऊक किंमत निर्देशांकविषयक आकडेवारी (आधार वर्ष 2011-12)

Posted On: 14 MAR 2024 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 मार्च 2024

 

फेब्रुवारी 2023 या महिन्याच्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठीचा अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय)आधारित चलनफुगवट्याचा दर 0.20% (प्राथमिक) इतका आहे. फेब्रुवारी,2024 मधील चलनफुगवट्याचा सकारात्मक दर प्रामुख्याने खाद्यान्ने,  कच्चे पेट्रोलियम तेल आणि नैसर्गिक वायू,  वीज, यंत्रे आणि उपकरणे तसेच मोटर वाहने, ट्रेलर्स आणि सेमी ट्रेलर्स इत्यादीच्या किंमती वाढल्यामुळे दिसून आला आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात सर्व वस्तूंच्या महागाई दरात आणि घाऊक किंमत निर्देशांक घटकांच्या दरात झालेला बदल खाली दिला आहे:

निर्देशांक संख्या आणि चलनफुगवट्याचा वार्षिक दर (% मध्ये Y-o-Y)*

All Commodities/Major Groups

Weight (%)

Dec-23

Jan-24 (P)

Feb-24 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

All Commodities

100.0

151.8

0.86

151.1

0.27

151.2

0.20

I. Primary Articles

22.62

182.8

5.73

181.0

3.84

181.4

4.49

II. Fuel & Power

13.15

155.8

-1.39

154.8

-0.51

155.1

-1.59

III. Manufactured Products

64.23

140.0

-0.78

139.8

-1.13

139.8

-1.27

Food Index

24.38

179.9

5.39

178.0

3.79

178.3

4.09

टीप: P: तात्पुरती, *मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत मोजण्यात आलेला डब्लूपीआय चलनफुगवट्याचा वार्षिक दर

फेब्रुवारी,2024 साठीच्या घाऊक किंमत निर्देशांकात जानेवारी 2024 मधील दरांच्या तुलनेत मासिक स्तरावर 0.07%  इतका बदल झाला आहे.  गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत प्रत्येक महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकात झालेले बदल एकत्रितपणे खाली मांडले आहेत:

Month Over Month (M-o-M in %) change in WPI Index#

All Commodities/Major Groups

Weight

Sep-23

Oct-23

Nov-23

Dec-23

Jan-24 (P)

Feb-24 (P)

All Commodities

100.0

-0.46

0.46

0.39

-0.85

-0.46

0.07

I. Primary Articles

22.62

-3.52

0.93

1.24

-2.56

-0.98

0.22

II. Fuel & Power

13.15

2.68

1.57

0.45

-0.26

-0.64

0.19

III. Manufactured Products

64.23

0.36

0.00

-0.14

-0.14

-0.14

0.00

Food Index

24.38

-4.65

1.07

2.00

-2.18

-1.06

0.17

टीप: पी : तात्पुरता, प्रत्येक महिन्यातील दरावर आधारित (एम-ओ-एम) डब्लूपीआय #Monthly बदलाचा दर

डब्लूपीआय च्या प्रमुख गटांमधील दर महिन्यात झालेले बदल:

  1. प्राथमिक वस्तू (भार22.62%):- या महत्त्वाच्या गटासाठीचा निर्देशांक 0.22% ने वाढून फेब्रुवारी 2024 मध्ये 181.4 (तात्पुरता) झाला. जानेवारी2024 मध्ये हा निर्देशांक 181.0 इतका (तात्पुरता) होता. जानेवारी2024 या महिन्यातील दरांच्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये खनिजे (2.80%), कच्चे पेट्रोलियम तेल आणि नैसर्गिक वायू (2.18%), खाद्यान्ने (0.26%) यांच्या किंमती वाढल्या. जानेवारी2024 च्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये बिगर-खाद्य उत्पादनांच्या किंमती (-1.73%) कमी झाल्या.
  2. इंधन आणि उर्जा (भार 13.15%):- या मुख्य गटासाठीचा जानेवारी 2024 मध्ये 154.8 (तात्पुरता)निर्देशांक होता त्यात 0.19% वाढ होऊन तो फेब्रुवारी 2024 मध्ये 155.1 (तात्पुरता) झाला आहे. जानेवारी 2024 मधील दरांच्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये वीज (0.77%) आणि खनिज तेल (0.06%) यांच्या दरात वाढ झाली तर कोळशाचे दर (-0.15%)कमी झाले.
  3. उत्पादित वस्तू (भार 64.23%): जानेवारी 2024 मधील दरांच्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये या महत्त्वाच्या गटासाठीचा निर्देशांक 139.8  (तात्पुरता) वर स्थिर होता. या 22 एनआयसी दोन अंकी गटातील उत्पादित प्रकारच्या वस्तूंपैकी,  दहा गटातल्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे तर 8 गटांतील वस्तूंच्या किमतीत घट झाली आहे, 4 गटांतील वस्तूंच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत.दरांमध्ये दर महिन्याला बदल झाल्याचे दर्शवणाऱ्या काही महत्त्वाच्या गटांमध्ये वस्त्रे, औषधे, वैद्यकीय, रासायनिक तसेच  वनस्पतीशास्त्रीय उत्पादने, मोटार वाहने, ट्रेलर्स आणि सेमी ट्रेलर्स, विजेची उपकरणे, तंबाखूयुक्त उत्पादने  यांचा समावेश आहे. जानेवारी 2024 मधील दरांच्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये दरात घसरण नोंदवलेले काही गट पुढीलप्रमाणे आहेत:मूलभूत धातू,  इतर बिगर-धातू खनिज उत्पादने, घडवलेली धातू उत्पादने (यंत्रे आणि उपकरणे सोडून),रबर आणि प्लास्टिकची उत्पादने तसेच छपाई आणि रेकॉर्ड केलेल्या माध्यम साहित्याचे पुनरुत्पादन, इत्यादी.

डब्ल्यूपीआयवर आधारित अन्नधान्य निर्देशांक (भार 24.38%):  संबंधित प्राथमिक स्वरूपाच्या वस्तूंच्या गटातील खाद्यपदार्थ तसेच आणि उत्पादित वस्तू गटातील  तयार खाद्यपदार्थ यांचा अन्न निर्देशांक, जानेवारी 2024 मध्ये 178.0 होता, त्यात वाढ होऊन तो फेब्रुवारी 2024 मध्ये 178.3% झाला आहे. डब्ल्यूपीआय अन्न निर्देशांकावर  आधारित  चलनफुगवट्याचा दर, जानेवारी 2024 मध्ये, 3.79% इतका होता, त्यात वाढ होऊन फेब्रुवारी 2024 महिन्यात तो 4.09% झाला आहे.

डिसेंबर, 2023 महिन्यासाठी अंतिम निर्देशांक (आधारभूत वर्ष: 2011-12=100): डिसेंबर, 2023 महिन्यासाठी अंतिम घाऊक किंमत निर्देशांक आणि 'सर्व वस्तूं'साठी चलनफुगवटा दर अनुक्रमे 151.8 आणि 0.86% होता. अद्ययावत आकडेवारीवर आधारित विविध वस्तू गटांसाठी अखिल भारतीय डब्ल्यूपीआय आणि चलनफुगवटा दरांचे तपशील परिशिष्ट I मध्ये दिले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील विविध वस्तू गटांसाठी डब्लूपीआयवर आधारित वार्षिक चलनफुगवठ्याचा दर (Y-o-Y) परिशिष्ट II मध्ये मांडला आहे.  विविध वस्तू गटांसाठीचा गेल्या सहा महिन्यांतील डब्लूपीआय परिशिष्ट III मध्ये दिला आहे.

प्रतिसाद दर: फेब्रुवारी 2024 साठीचा डब्ल्यूपीआय,  85.0 टक्के भारित प्रतिसाद दराने एकत्रित केला आहे, तर डिसेंबर, 2023  साठीची अंतिम आकडेवारी 94.9 टक्के भारित प्रतिसाद दरावर आधारित आहे. डब्ल्यूपीआय अंतिम पुनर्आढावा धोरणानुसार डब्लूपीआय डब्ल्यूपीआयच्या तात्पुरत्या आकडेवारीत सुधारणा केली जाईल.  हे प्रसिद्धी पत्रक, वस्तू निर्देशांक आणि चलनफुगवट्याची आकडेवारी आमच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे: http://eaindustry.nic.inवर उपलब्ध आहे.

प्रसिद्धी पत्रक जारी करण्याची पुढील तारीख: मार्च, 2024 साठीचा डब्लूपीआय  15/04/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

टीप: डीपीआयआयटी दर महिन्याच्या 14 तारखेला (किंवा त्यापुढील कामकाजाच्या दिवशी) भारतातील डब्ल्यूपीआय अर्थात घाऊक किंमतीचा निर्देशांक संदर्भित महिन्याच्या दोन आठवड्यांच्या अंतराने जारी करते आणि संस्थात्मक स्त्रोतांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरुन निर्देशांक संकलित केला जातो. या प्रसिद्धी पत्रकात फेब्रुवारी 2024 (तात्पुरते), डिसेंबर, 2023 (अंतिम) आणि इतर महिने/वर्षांसाठीचा डब्लूपीआय (आधारभूत वर्ष 2011-12=100) समाविष्ट आहे.  डब्लूपीआयची तात्पुरती आकडेवारी 10 आठवड्यांनंतर (संदर्भ महिन्यापासून) अंतिम केली जाते आणि त्यानंतर गोठवली जाते.

फेब्रुवारी 2024 साठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि चलनफुगवट्याचा दर (आधारभूत वर्ष: 2011-12=100) - परिशिष्ट-I, II, III

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2014590) Visitor Counter : 89


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri