सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

पंतप्रधानांनी केला प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवम रोजगार जनकल्याण (पीएम-सूरज) पोर्टलचा शुभारंभ

Posted On: 13 MAR 2024 10:14PM by PIB Mumbai

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने समाजातील वंचित घटकांना कर्जसहाय्य देण्याच्या उद्देशाने एका देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवम रोजगार जनकल्याण(पीएम-सूरज) राष्ट्रीय पोर्टलचे ऑनलाईन प्रकाशन केले. हे पोर्टल म्हणजे वंचितांना प्राधान्य देण्याच्या , समाजातील सर्वात उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी मंत्रालयाच्या बांधिलकीचे प्रतीक आहे आणि वंचित समुदायातील एक लाख उद्योजकांना कर्ज पुरवठ्याचे पाठबळ दिले आहे.

यावेळी पंतप्रधानांनी विविध राज्यांमधील नमस्ते, व्हीसीएफ-एससी, व्हीसीएफ-बीसी, एएसआयआयएम या योजनांच्या अनुसूचित जमाती, मागास वर्ग आणि सफाई मित्र यांचा समावेश असलेल्या वंचित समूहातील लाभार्थ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला.  

त्याशिवाय मंत्रालयाकडून मैला आणि सेप्टिक टँक कामगारांना(सफाई मित्र) राष्ट्रीय यांत्रिक स्वच्छता परिसंस्था कार्ययोजने(NAMASTE) अंतर्गत आयुष्मान आरोग्य कार्ड आणि पीपीई किट्सचे वाटप करण्यात आले.

आयुष्मान आरोग्य कार्ड हे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(एबी-पीएमजेएवाय), या सरकार पुरस्कृत आरोग्य विमा योजने अंतर्गत जारी केलेले एका प्रकारचे ओळखपत्र आहे. यामुळे लाभार्थ्यांना पॅनेलबद्ध रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सुविधा उपलब्ध होतात. या कार्डावर लाभार्थ्याची यूऩिक आयडेंटिफिकेशन क्रमांक आणि आरोग्य सेवांतर्गत असलेले तपशील यांच्यासह महत्त्वाची माहिती असते.

पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट(पीपीई) किटमध्ये विविध प्रकारच्या संरक्षक वस्त्रे आणि साहित्याचा समावेश असतो, ज्यांचा उपयोग व्यक्तीचे आऱोग्यविषयक समस्या किंवा इन्फेक्शन यापासून संरक्षण करण्यासाठी होतो. या किटमध्ये सामान्यतः मास्क, ग्लोव्हज, गॉगल्स, फेस शील्ड्स, गाऊन्स आणि शू कव्हर्स यांसारख्या वस्तूंचा समावेश असतो. आघाडीवर काम करणाऱ्या कामगारांना विशेषतः धोकादायक वातावरणात किंवा संसर्गजन्य आजाराची शक्यता असलेल्या वातावरणात काम करणाऱ्या मैलासफाई किंवा सेप्टिक टँक कामगारांना सुरक्षा पुरवण्यासाठी हे पीपीई किट महत्त्वाचे आहेत.

या इतिहासकाळापासून उपेक्षित किंवा दुर्लक्षित राहिलेल्यांकडे लक्ष पुरवण्याच्या आणि त्यांना आवश्यक असलेले पाठबळ देण्याच्या सरकारच्या “वंचितों को वरियता” या बांधिलकीची पुष्टी या कार्यक्रमाद्वारे झाली. वंचितांना प्राधान्य देण्याची ही बांधिलकी सरकारच्या “विकसित भारत” या व्यापक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे जिथे प्रत्येक व्यक्तीला योगदान देण्याची आणि भारताच्या विकास प्रवासाचा लाभ देण्याची संधी आहे.

या कार्यक्रमाला लोकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तीन लाखांहून अधिक व्यक्ती ऑफलाईन उपस्थित राहिले होते आणि अतिरिक्त तीन लाख प्रेक्षक ऑनलाईन उपस्थित होते. हा प्रचंड सहभाग समाजातील सर्व घटकांसाठी सर्वसमावेशकता आणि समृद्धी वाढवण्याचा सामूहिक निर्धार अधोरेखित करत आहे. सहकार्यात्मक प्रयत्न आणि एकत्रित उपक्रमांद्वारे, कोणालाही मागे पडू न देण्याच्या आणि अधिक न्याय्य आणि सशक्त समाज घडवण्याच्या आपल्या उद्दिष्टांवर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय ठाम आहे .

***

Sonalt/ShaileshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2014504) Visitor Counter : 70


Read this release in: Bengali-TR , English , Urdu , Hindi