सांस्कृतिक मंत्रालय
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग उद्या सुधारित संकेतस्थळाचे अनावरण तसेच वारसा दत्तक विधान 2.0 अंतर्गत स्मारक दत्तक घेण्यासाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करणार
प्रविष्टि तिथि:
11 MAR 2024 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2024
भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासह प्रवेशयोग्यता आणि बांधिलकी वाढविण्याच्या घोषणेनुसार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभाग देशभरातील नागरिकांच्या वैविध्यपूर्ण गरजांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने त्याच्या सुधारित संकेतस्थळाच्या अनावरणाकरिता सज्ज आहे. हे अनावरण 12 मार्च 2024 रोजी नवी दिल्लीमधील राष्ट्रीय संग्रहालयात नियोजित आहे. हे नवीन श्रेणीसुधारित संकेतस्थळ वैविध्यपूर्ण कार्यपद्धतीनी सुसज्ज आहे ज्यात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या प्रत्येक दृष्टिकोनातून बारकाईने निरीक्षण करता येईल. याद्वारे वापरकर्ते सहजतेने ऐतिहासिक स्थळांपासून ते शैक्षणिक संसाधनांपर्यंत भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे विविध पैलू अभ्यासू शकतात.

शिवाय, हे संकेतस्थळ विद्यार्थ्यांना माहिती संपादनात एक मौल्यवान संसाधन ठरेल. देशाचा सांस्कृतिक ठेवा प्रेक्षकांसाठी व्यापक प्रमाणावर उपलब्ध असल्याची खात्री देत हे सर्वसमावेशक डिजिटल संधारण सर्वांच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यात एएसआय ची बांधिलकी दर्शवते.
भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने एका महत्त्वपूर्ण विकासात, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाने 'अडॉप्ट अ हेरिटेज 2.0' अर्थात वारसा दत्तक विधान 2.0 कार्यक्रमाची संकल्पना मांडली असून आता स्मारके दत्तक घेण्यासाठी विविध संस्थांसोबत सामंजस्य करारावर (एमओयू) वर स्वाक्षरी करणार आहे.
देशभरात एएसआय च्या संरक्षणाखाली 3600 हून अधिक स्मारके असून या सांस्कृतिक ठेव्याला भेट देणाऱ्या अभ्यागतांचे अनुभव समृद्ध करून त्यांच्या सुरक्षेबाबत खातरजमा करण्याकरिता बाह्य भागीदारांसोबत सहकार्याचे महत्त्व एएसआय जाणतो. सामंजस्य करारांवर स्वाक्षरी म्हणजे या संस्थांची विशिष्ट स्मारके दत्तक घेऊन त्यांच्या देखभालीसाठी योगदान देण्याची आणि लोकांसमोर अधिक चांगले प्रदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची औपचारिकता होय.

या कार्यक्रमात राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि अन्य मान्यवरांसोबत विविध संस्थांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार आहे ज्याद्वारे भारताच्या वैविध्यपूर्ण वारशाच्या जतनात भागीदारी वाढवण्यासाठी सरकारचे समर्पण अधोरेखित होते.
स्मारक सारथी/साथीच्या निवड प्रक्रियेमध्ये योग्य परिश्रम, विविध संस्थांशी चर्चा आणि प्रत्येक स्मारकावरील त्यांच्या वचनबद्धतेचे तसेच संधींचे मूल्यांकन यांचा समावेश होतो. निवडलेले स्मारक सारथी/साथी स्वच्छता, सुलभता, सुरक्षितता आणि ज्ञान श्रेणींमध्ये सुविधा प्रदान करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी, त्यांना जबाबदार आणि वारसा-अनुकूल संस्था म्हणून स्थान देण्यासाठी जबाबदार असतील.
हा उपक्रम सध्याच्या ॲडॉप्ट अ हेरिटेज 2.0 कार्यक्रमावर आधारित आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आमच्या वारशाचे रक्षण करण्यासाठी आणि अभ्यागतांसाठी सर्वतोपरी अनुभव समृद्ध करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी दोन्ही संस्थांची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करतो.
स्मारकांमध्ये कुतुबमिनार, पुराना किला, उग्गर सैनची बावली (सरोवर), हुमायुचा मकबरा, अगुआडा किल्ला, एलिफंटा लेणी, आग्रा किल्ला, भीमबेटका, बौद्ध स्तूप, कैलासनाथ मंदिर, खजुराहो मंदिरांचा समूह, सफदरजंग मकबरा, ग्रूप ऑफ मॉन्यूमेन्ट्स, ममलापुरम, जमाली कमाली मधील विभाग, बलबनचा मकबरा आणि कोणार्कचे सूर्य मंदिर यांचा समावेश आहे.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2013496)
आगंतुक पटल : 290