संरक्षण मंत्रालय
कटलेस एक्स्प्रेस 24 मध्ये प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रनचा सहभाग
Posted On:
10 MAR 2024 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मार्च 2024
INS तीर हे प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन जहाज सेशेल्समध्ये पोर्ट व्हिक्टोरिया येथे 28 फेब्रुवारी ते आठ मार्च 2024 दरम्यान झालेल्या कटलेस एक्सप्रेस -24 (CE -24) या सरावात सहभागी झाले.
या सरावाचे उद्घाटन सेशेल्सच्या राष्ट्रपतींनी भारत, अमेरिका आणि आफ्रिकन देशांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत केले. कटलेस एक्सप्रेसचा भाग म्हणून भारतीय नौदलाने 16 मित्र देशांसह या सरावात सक्रिय भाग घेतला.
सागरी प्रतिबंध प्रक्रिया, व्हिजीट बोर्ड शोध आणि ताबा प्रक्रिया, आणि डायव्हिंग ऑपरेशन्स याविषयी सैद्धांतिक तसेच प्रयोगसिद्ध बाबतीत हे प्रशिक्षण दिले गेले. सागरी सराव सत्रात जहाजाच्या VBSS (विजिट, बोर्ड, सर्च ,सिजर) दलाने सेशेल्स तटरक्षक जहाज LE विजिलन्टवर बोर्डिंग करून बोर्डिंग प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवले. भारतीय डायव्हर्सनी अमेरिकन आणि सेशेल्स डायव्हर्ससह कठोर प्रशिक्षण सप्ताहानंतर संयुक्त डायव्हिंग ऑपरेशन्स पार पाडली.भारतीय नौदल 2019पासून अशा सरावात सहभागी होत आहे.
सेशेल्समध्ये INS तीर तैनात करण्यामुळे आणि कटलेस एक्सप्रेस सरावात सहभाग यामुळे भारतीय नौदल आणि स्थानिक नौदल यांच्यामध्ये इंटरऑपरेटिबिलिटी आणि मैत्रीचे बंध दृढ करणे अधोरेखित केले जाते.
* * *
NM/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013456)
Visitor Counter : 83