जलशक्ती मंत्रालय

केंद्रीय जलशक्ती मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले जलशक्ती अभियान सुरू:  पावसाचे पाणी वाचवा (कॅच द रेन ) 2024 चळवळ


महिलांना सक्षम करण्यासाठी आणि जल -सुरक्षित भविष्याची हमी मिळण्यासाठी  पावसाचे पाणी वाचवा (कॅच द रेन) मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे आवाहन

नवी दिल्लीतील एन डी एम सी कन्व्हेन्शन सेंटर येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 9 मार्च 2024 रोजी "जल शक्ती अभियान: पावसाच्या पाण्याचे रक्षण करा " मोहिमेच्या पाचव्या आवृत्तीचा प्रारंभ केला

Posted On: 10 MAR 2024 2:34PM by PIB Mumbai

 

"नारी शक्ती से जल शक्ती" ही संकल्पना असलेल्या या  मोहीमेत जलसंधारण आणि व्यवस्थापनात महिलांच्या अविभाज्य भूमिकेवर भर दिला गेला आहे. राष्ट्रीय जल अभियान, जलसंपदा विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन अंतर्गत पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या सहकार्याने हे अभियान राबवले जात आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी "जल शक्ती अभियान 2019 ते 2023- पाण्याच्या शाश्वत भवितव्याचा प्रवास " आणि "स्त्री शक्तीचे 101 ओझरते दर्शन : जल जीवन चळवळीच्या लोलकातून " या दोन पुस्तकांचे आभासी माध्यमातून लोकार्पण केले.

जलसंवर्धन आणि भविष्यात त्याचा शाश्वत वापर याविषयी सामूहिक बांधिलकी दर्शवणाऱ्या शुभ 'जल कलश' सोहळ्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. "जल शक्ती अभियान 2019 ते 2023 - जलसुरक्षेकडे कूच करणारी सार्वजनिक चळवळ" आणि (ii) "जल जीवन मिशनचे लघुपट" या दोन लघुपटांसह लडाखचे लघुपट देखील या कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आले, ज्यात महिला योद्ध्या,सरपंच, ग्राम जल आणि स्वच्छता समिती सदस्य, राज्य सरकारचे पाणीपुरवठा प्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नदी निकास आणि गंगा पुनरुज्जीवन, पेयजल आणि स्वच्छता विभाग, स्वयंसेवी संस्था, राज्य सरकारचे अधिकारी, भागीदार मंत्रालयांचे अधिकारी/ जलशक्ती मंत्रालयाचे विभाग, पत्रकार/माध्यम व्यक्ती इत्यादींचा सहभाग होता.

या भव्य समारंभात संबोधन करताना केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी जलसंधारण आणि शाश्वत व्यवस्थापनाच्या  गांभीर्यपूर्ण महत्वावर भर दिला आणि आपल्या जीवनात तसेच अर्थव्यवस्थेत पाण्याची अत्यावश्यक भूमिका अधोरेखित केली. JSA:CTR – 2024 हे जलसंवर्धन आणि शाश्वत विकासाबाबत सरकारच्या अतूट वचनबद्धतेचा पुरावा आहे आणि या प्रयत्नांमध्ये 'नारी शक्ती'ची प्रमुख भूमिका आहे असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणामुळेच राष्ट्र सक्षम होईल, असा आमचा ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिला देशातल्या महिलांचे प्रतिनिधित्व करतात ज्यांनी आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या आपल्या पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी  स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.  जलशक्ती अभियान, स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन आणि अटल भुजल योजना यांसारख्या योजना/मोहिमांच्या यशात योगदान देणाऱ्या महिलांच्या अतुलनीय प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. महिलांनी सामुदायिक प्रयत्नातून प्रभावीपणे जलस्रोतांचे संवर्धन केले आहे, यावरही त्यांनी भर दिला. महिलांमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि नवनवीन शोध घेण्याची क्षमता असते, त्यांची शक्ती आणि जलस्रोत व्यवस्थापनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता दिसून येते असे ते पुढे म्हणाले. भारताचे शेवटच्या, मोडकळीस आलेल्या, पाचव्या क्रमांकावरून सर्वोच्च 5 क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन झाले आहे. आपल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचे आमचे ध्येय असून  त्यामुळे देशातील आर्थिक घडामोडींमध्ये वाढ होऊन परिणामी आपली पाण्याची मागणी वाढेल जी प्रभावी एकात्मिक जल व्यवस्थापनाद्वारे हाताळली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

भारताची पाण्याची मागणी भूजल आणि पावसावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. नळाद्वारे येणाऱ्या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी बाहय चाचणी उपकरणे (FTK) वापरून पाण्याचे नमुने तपासण्यासाठी सुमारे 24 लाख महिलांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे मंत्र्यांनी नमूद केले. जल अर्थसंकल्प आणि जलसुरक्षा योजना तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये किमान 33% महिला सदस्यांचे प्रतिनिधित्व अटल भुजल योजनेमुळे सुनिश्चित केले जात असल्याचे केंद्रीय मंत्री यांनी संगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याच्या भूमिकेतून  होत असलेल्या केलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी आभार व्यक्त केले.

याआधीच्या मोहिमांमध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे या मोहिमेचे जलसंधारणाच्या लोकचळवळीत रूपांतरण झाल्याबाबत त्यांनी कौतुक व्यक्त केले. सर्व नागरिकांना "जल शक्ती अभियान:  पावसाचे पाणी वाचवा (कॅच द रेन" ) - 2024 मध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन शेखावत यांनी केले. जल-सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठी एक परिवर्तनवादी चळवळ म्हणून त्यांनी या अभियानाची परिकल्पना केली आहे.

***

G.Chippalkatti/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013219) Visitor Counter : 79


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil