सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्य विकासासाठी इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडियासोबत केला सामंजस्य करार
Posted On:
09 MAR 2024 9:56AM by PIB Mumbai
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण आणि कौशल्य विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, दिव्यांग सक्षमीकरण विभागाने इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया सोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली 08 जानेवारी 2024 रोजी सामंजस्य करार करण्यासाठीची कागदोपत्री औपचारीकता पूर्ण करण्यात आली होती, ज्याचा उद्देश दिव्यांगांना इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विविध नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या विशेष कौशल्यांनी सुसज्ज करणे हा आहे.
हा ऐतिहासिक सामंजस्य करार उद्योगाच्या मागणीच्या अनुषंगाने व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे मानवी संसाधने विकसित करण्याच्या सहयोगी प्रयत्नांचे प्रतीक आहे. ईएसएससीआयच्या कौशल्याचा फायदा घेऊन, या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींसाठी शाश्वत उपजीविकेचा मार्ग मोकळा करणे आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मनुष्यबळ तयार करणे हा आहे.
सामंजस्य कराराच्या अटींनुसार, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र कौशल्य परिषद आणि राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषद (एनसीव्हीईटी) अभ्यासक्रमाच्या मानकांनुसार दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. याव्यतिरिक्त, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र कौशल्य परिषद प्रशिक्षणार्थींसाठी अखंड नियुक्त्यांचा संधी सुनिश्चित करण्यासाठी संभाव्य नियोक्ते आणि औद्योगिक संपर्काशी संबंध सुलभ करेल. महत्त्वाचे म्हणजे, या नियुक्ती किमान वेतन कायदा आणि उद्योग मानकांच्या अनुषंगाने मासिक पगाराची हमी देईल.
याव्यतिरिक्त, इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया नियुक्त्यांनंतर किमान तीन महिने समुपदेशन आणि ट्रॅकिंग सेवा प्रदान करून नियुक्तीनंतरच्या मदतीसाठी आपली वचनबद्धता कायम ठेवेल, ज्यामुळे पीडबल्यूडीएसच्या मनुष्यबळामध्ये निरंतर यश आणि एकीकरण सुनिश्चित होईल.
हे सहकार्य सर्वसमावेशकता आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील दिव्यांग लोकांसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या भारतीय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र कौशल्य परिषदेच्या वचनबद्धतेची पुष्टी करते.
***
M.Iyengar/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2012981)
Visitor Counter : 89