सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे केले राष्ट्रीय सहकारी डेटाबेस आणि राष्ट्रीय सहकारी डेटाबेस 2023 : अहवालाचे केले प्रकाशन


सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार

सहकार क्षेत्राचा विस्तार, विकास आणि वितरणासाठी राष्ट्रीय डेटाबेसची निर्मिती

Posted On: 08 MAR 2024 6:26PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी डेटाबेसचे उद्घाटन केले.  त्यांनी राष्ट्रीय सहकारी डेटाबेस 2023 : अहवालही  प्रसिद्ध केला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच सहकार क्षेत्राविषयीची माहिती संगणक प्रणालीत एकत्रितपणे संग्रहित झाली असून सहकार क्षेत्र, त्याचा विस्तार आणि बळकटीकरणासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे, असे शहा यावेळी म्हणाले. त्यामुळे सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढून त्याला चालना मिळणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या डेटाबेसमुळे सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

कोट्यवधी लोकांना देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि विकासाशी जोडण्यासाठी सहकार मंत्रालय सक्रियपणे काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. सहकाराचा विस्तार, डिजिटल विकास आणि डेटाबेसद्वारे वितरण यामध्ये सहकारी डेटाबेस महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे शहा म्हणाले. योग्य दिशेने विकासासाठी डेटाबेस मार्गदर्शन करेल आणि त्रुटीविषयीचे विश्लेषण करण्यासाठी ही माहिती अत्यंत प्रभावी ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राष्ट्रीय सहकारी डेटाबेस तीन टप्प्यात तयार करण्यात आला, अशी माहिती शहा यांनी दिली.

सहकार क्षेत्राच्या संगणकीकरणाशी संबंधित अनेक उपक्रम मोदी सरकारने हाती घेतल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

धोरणकर्ते, संशोधक आणि संबंधित घटकांसाठी माहितीचा एक अमूल्य साठा म्हणून सहकारी डेटाबेस काम करेल, असे ते पुढे म्हणाले.

एका व्यापक वैज्ञानिक प्रणालीद्वारे या डेटाबेसमधील माहितीची सत्यता, अचुकता पडताळणीची आणि  नियमित अद्ययावतीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे   असे त्यांनी सांगितले. केवळ पडताळून पाहिलेली अचूक माहितीच या डेटाबेसवर नियमितपणे उपलब्ध होईल याची काळजी गृह मंत्रालय घेईल, अशी ग्वाही शहा यांनी दिली.

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2012895) Visitor Counter : 123


Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu