गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार संरक्षण दलांची क्षमता निर्मिती आणि बळकटीकरण करण्याप्रती संपूर्णपणे कटिबद्ध आहे
Posted On:
07 MAR 2024 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार संरक्षण दलांची क्षमता निर्मिती आणि बळकटीकरण करण्याप्रती संपूर्णपणे कटिबद्ध आहे. संरक्षण दलांचे सामर्थ्य आणखी वाढवण्यासाठी हाती घेतलेला महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ईसीआयएल), अणुउर्जा विभाग (डीएई) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांनी भारतीय संरक्षण दलांसाठी स्फोटक पदार्थ शोधकांच्या दोन वेगवेगळ्या श्रेणी विकसित केल्या आहेत.
संरक्षण दलांतर्फे वापर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा.अजय कुमार सूद यांनी नुकतीच ही स्फोटक शोधके गुप्तचर विभागाच्या (आयबी) संचालकांकडे सुपूर्द केली. आता प्रत्यक्ष वापरासाठी ही स्फोटक शोधके या संचालकांकडून 12 निवडक संरक्षण संस्थांकडे हस्तांतरित करण्यात येतील. केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार सूद यांनी या शोधकांच्या यशस्वी उत्पादनाला आत्मनिर्भर भारताचे झळाळते उदाहरण म्हटले आहे.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2012331)
Visitor Counter : 107