भारतीय स्पर्धा आयोग
भारतीय स्पर्धा आयोगातर्फे उद्या स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावर 9 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
Posted On:
04 MAR 2024 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मार्च 2024
भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीसीआय) उद्या नवी दिल्ली येथे स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावरील 9 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. सीसीआय 2016 पासून दरवर्षी परिषदेचे आयोजन करत आहे.
उद्घाटनपर सत्रात नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद विरमानी यांचे बीजभाषण असेल. परिषदेत एक पूर्ण सत्र आणि दोन तांत्रिक सत्रे असतात.
या वर्षीच्या परिषदेतील पूर्ण सत्र हे "कृत्रिम बुद्धिमत्ता: आव्हाने आणि संधी" या विषयावर आहे. कायदेशीर धोरणासाठीच्या विधी केंद्राचे संस्थापक आणि संशोधन संचालक डॉ. अर्घ्य सेनगुप्ता या पूर्ण सत्राचे नियंत्रक आहेत. शिव नाडर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस चे प्राध्यापक आणि अधिष्ठाता डॉ. रजत कथुरिया आणि गुडगावच्या व्यवस्थापन विकास संस्थेच्या आर्थिक आणि सार्वजनिक धोरण विभागाचे प्राध्यापक डॉ. रोहित प्रसाद हे या दोन तांत्रिक सत्रांचे अध्यक्षपद भूषवतील.
स्पर्धा कायद्याच्या अजेंडाच्या अर्थशास्त्रावर राष्ट्रीय परिषद
ही परिषद स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्राच्या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञांना एकत्र आणेल. परिषदेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
a. स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील समकालीन विषयांवर संशोधन आणि चर्चेला चालना देणे,
b. भारतीय संदर्भाशी संबंधित स्पर्धाविषयक मुद्द्यांची चांगली समज विकसित करणे आणि
c. भारतातील स्पर्धा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निष्कर्ष काढणे.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2011434)