ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

विपरित प्रभाव पाडू शकणाऱ्या ऑनलाईन गेमिंगच्या हानिकारक आवेग नियंत्रण वर्तणूक पद्धतींवर संशोधन करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाची राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जातंतूविज्ञान, बंगळुरू (निम्हान्स) बरोबर चर्चा


ऑनलाईन गेमिंगच्या इंटरनेटवरील डिजिटल ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या सुरक्षेसाठी भविष्यसूचक आणि प्रतिबंधात्मक मॉडेल तयार करणे हा यामागचा उद्देश

Posted On: 04 MAR 2024 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मार्च 2024

 

विपरित प्रभाव पाडू शकणाऱ्या ऑनलाईन गेमिंगच्या हानिकारक आवेग नियंत्रण वर्तणूक पद्धतींवर संशोधन करण्याबाबत ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि  मज्जातंतूविज्ञान, बंगळुरू  बरोबर प्रस्ताव मांडला.  या संदर्भात 4.3.24 रोजी ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. ग्राहक व्यवहार विभागाचे सहसचिव अनुपम मिश्रा, निम्हान्सच्या संचालक डॉ प्रतिमा मूर्ती आणि  निम्हान्स च्या क्लिनिकल सायकॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. मनोज शर्मा  हे या चर्चेत सहभागी झाले होते.

ग्राहक व्यवहार सचिव यांनी नमूद केले की ऑनलाईन गेमिंग व्यसनामुळे समाजापासून  दुरावा येतो आणि वास्तविक जीवनातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होते. यात अनेकदा सक्तीच्या गेमिंग वर्तनाचा समावेश होतो आणि त्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. ऑनलाईन गेमिंगमुळे वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो, ज्यामुळे इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे दुर्लक्ष होते आणि आर्थिक ताण येतो. ग्राहक विभागाच्या ज्ञान, उपभोग आणि पद्धतींवर आधारित एक जबाबदार डिजिटल उपभोग मॉडेल तयार करणे हा अभ्यासाचा उद्देश असून ऑनलाईन गेमिंगवर यात लक्ष केंद्रित  आहे जे नंतर डिजिटल सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला देखील लागू होऊ शकते. या अभ्यासात ऑनलाईन सामग्रीच्या अत्यधिक वापराचे मूलभूत घटक ओळखण्यात येतील  आणि या घटकांच्या परीक्षणाच्या आधारे, अंदाज वर्तवण्याजोग्या, सतर्क आणि योग्य मुकाबला यंत्रणेसह हस्तक्षेप करण्यासाठी एक आराखडा तयार केला जाऊ शकतो. हा अभ्यास ग्राहकांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि आर्थिक तसेच  भौतिक दोन्ही जोखीम कमी करण्यासाठी मार्गदर्शन करेल.

निम्हन्सच्या संचालकांनी  विविध संघटना /संस्था/अधिकारी यांच्याशी डेटा संकलन, वयोगट सारखे विभागनिहाय विश्लेषण,  आणि ग्राहकांचा सामाजिक-आर्थिक स्तर इत्यादींसाठी आवश्यक  सहकार्यांची आणि काही उपाय शोधणे तसेच  वाढीव उपभोग  कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणेची रूपरेषा मांडली.  आरोग्यदायी डिजिटल सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अतिरिक्त वापर रोखण्यासाठी काही यंत्रणा आखण्याची गरज  मांडली. निम्हान्सच्या संचालकांनीही हा प्रकल्प काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

संशोधनाचे निष्कर्ष, केवळ ऑनलाईन गेमिंगमधील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी  तसेच जोखीम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या वर्तनाबाबत उद्योगांना देखील मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी धोरणात्मक माहिती  प्रदान करतील.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2011429) Visitor Counter : 84


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi