आयुष मंत्रालय
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते आयुष आरोग्यसेवा सुविधांसाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांचे अनावरण
गेल्या 10 वर्षातील आयुष मंत्रालयाच्या कामगिरीवरील पुस्तिकेचे प्रकाशन
Posted On:
04 MAR 2024 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मार्च 2024
समन्वित औषधाची वेळ आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आयुष आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात केले. पारंपरिक आरोग्यसेवा हा भविष्यातील नवीन फॅशन ट्रेंड असेल असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्र्यांनी आयुष मंत्रालयाच्या गेल्या दशकातील उल्लेखनीय वाटचालीबद्दल अभिनंदन केले आणि आयुष आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय एकमेकांशी संलग्न असल्याचे नमूद केले.
आजच्या संयुक्त भव्य कार्यक्रमात, डॉ. मांडवीय यांनी देशभरातील निवडक एम्स मध्ये एकात्मिक आरोग्य संशोधनासाठी आयुष -आयसीएमआर प्रगत केंद्राची (एआय -एसीआयएचआर) स्थापना आणि पंडुरोगावरील मल्टीसेंटर क्लिनिकल चाचणीची घोषणा केली. उद्घाटन सत्रात "आयुष आरोग्यसेवा सुविधांसाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके" आणि राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचा 27वा दीक्षांत समारंभ आणि ‘आयुर्वेदो अमृतनाम’ हे राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचे 29 वे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले.
आपल्या भाषणादरम्यान डॉ. मांडविया पुढे म्हणाले की आयुषमधील सहयोगी संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन यांच्यातील अंतर कमी करते तसेच आरोग्यसेवेसाठी समन्वयवादी दृष्टिकोनाला प्रोत्साहन देते असेही आपल्या भाषणादरम्यान डॉ. मांडवीय यांनी सांगितले. एकात्मिक आरोग्य संशोधनाला प्रगतीपथावर नेणे, पारंपरिक आयुष पद्धतींची आधुनिक वैद्यकीय शास्त्रासोबत सांगड घालणे आणि संपूर्ण आरोग्य सेवा नवोन्मेषात भारताला अग्रगण्य बनवणे हे आयुष आणि आयसीएमआर यांच्यातील धोरणात्मक सहकार्याचे उद्दिष्ट आहे.
आयुष रुग्णालये आणि आयुष्मान आरोग्य मंदिरासाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांवरील पुस्तिकांचे प्रकाशन डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान जामनगर (गुजरात) चे वैद्य गुरदीप सिंग, कोट्टाक्कल (केरळ) चे डॉ. पी. माधवनकुट्टी वारियर आणि अजमेर (राजस्थान) चे वैद्य विष्णू दत्त श्रीकिशन शर्मा यांना त्यांच्या क्षेत्रांतील उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान 13 आयुर्वेद अभ्यासकांना राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ (FRAV) चे 'फेलो' म्हणून गौरविण्यात आले.
1. वैद्य भावनाबेन मुंजपरा, अहमदाबाद (गुजरात)
Vaidya Bhavnaben Munjapara, Ahmedabad (Gujarat)
2. डॉ. ईना शर्मा, काँगड़ा (हिमाचल प्रदेश)
Dr. Eena Sharma, Kangra (Himachal Pradesh)
3. डॉ. जी.एस. बदेशा, रायपुर (छत्तीसगढ़ )
Dr. G.S. Badesha, Raipur (Chhattisgarh)
4. वैद्य मुरलीकृष्ण पारसराम, तिरुपति (आंध्र प्रदेश)
Vaidya Muralikrishna Parasaram, Tirupati (Andhra Pradesh)
5. वैद्य दत्तात्रेय मधुकरराव सराफ, नागपुर (महाराष्ट्र)
Vaidya Dattatraya Madhukarrao Saraf, Nagpur (Maharashtra)
6. वैद्य रामावतार शर्मा, चुरू (राजस्थान)
Vaidya Ramavatar Sharma, Churu (Rajasthan )
7. वैद्य (प्रा.) श्याम सुंदर शर्मा, भागलपुर (बिहार)
Vaidya (Prof.) Shyam Sunder Sharma, Bhagalpur (Bihar)
8. प्रा. (डॉ.) बिष्णु प्रसाद सरमा, गुवाहाटी (असम)
Prof. (Dr.) Bishnu Prasad Sarma, Guwahati (Assam)
9. वैद्य गोपालशरण गर्ग, अलीगढ़ (उत्तर प्रदेश)
Vaidya Gopalsharan Garg, Aligarh (Uttar Pradesh)
10. डॉ. युनुस गफ्फार सोलंकी, मुंबई (महाराष्ट्र)
Dr. Yunus Gaffar Solanki, Mumbai ( Maharashtra)
11. वैद्य मेधा पटेल, सूरत (गुजरात)
Vaidya Medha Patel, Surat (Gujarat)
12. डॉ. विभा द्विवेदी, बरेली (उत्तर प्रदेश)
Dr. Vibha Dwivedi, Bareilly (Uttar Pradesh)
13. डॉ. वैद्य संतोष भगवांरव नेवपुर, औरंगाबाद महाराष्ट्र
Dr Vaidya Santosh Bhagvaanrav Nevpurakar, Aurangabad, Maharashtra
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2011396)
Visitor Counter : 119