गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारत सरकार, त्रिपुरा सरकार आणि त्रिपरा मोथा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या द इंडियन प्रोग्रेसिव्ह रिजनल अलायन्स आणि इतर हितधारक यांच्यात आज नवी दिल्लीत त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी

Posted On: 02 MAR 2024 3:56PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारत सरकार, त्रिपुरा सरकार आणि  त्रिपरा मोथा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या द इंडियन प्रोग्रेसिव्ह रिजनल अलायन्स आणि इतर हितधारक यांच्यात  आज नवी दिल्लीत त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

त्रिपुरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून या कराराद्वारे आम्ही इतिहासाचा सन्मान करत सुधारणा करून तसेच आजचे वास्तव स्वीकारून भविष्याकडे पाहत आहोत, असे अमित शहा यावेळी म्हणाले.

त्रिपुरा सरकारने यासाठी नेहमीच अनेक प्रयत्न केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी त्रिपुराही आपले योगदान देण्यासाठी कटिबद्ध होईल तसेच आपले योगदान देईल  आणि विकसित त्रिपुरा म्हणून पुढे जाईल, असे शहा म्हणाले.  मोदी सरकारच्या अनेक करारांमुळे सुमारे 10 हजार लोकांनी आपली शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील झाले, त्यामुळे विकासाचे वातावरण निर्माण झाल्याचे शहा यांनी सांगितले.

मोदी सरकारने सीमा, अस्मिता, भाषा आणि संस्कृतीशी संबंधित 11 विविध करारांद्वारे लोकांशी संवाद साधून संघर्ष संपविण्याचे काम केले आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले म्हणाले. आजच्या करारामुळे तंटामुक्त होऊन पुढे जाण्यासाठी त्रिपुरा सरसावले आहे, असे ते म्हणाले.

या करारांतर्गत, त्रिपुरातील आदिवासींचा  इतिहास, जमीन आणि राजकीय हक्क, आर्थिक विकास, अस्मिता, संस्कृती आणि भाषा यासंबंधीचे सर्व प्रश्न सौहार्दपूर्ण पद्धतीने  सोडविण्याबाबत सहमती झाली आहे.  यासह, सन्माननीय तोडगा सुनिश्चित करण्यासाठी वरील सर्व मुद्द्यांवर काम करण्यासाठी तसेच परस्पर सहमती असलेल्या मुद्यांवर कार्य करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एक संयुक्त कार्यगट किंवा समिती स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले आहे.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2010995) Visitor Counter : 83