सांस्कृतिक मंत्रालय
एनजीएमए येथे मेळा क्षणचित्रे छायाचित्र स्पर्धेच्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उत्सुकता
पुरस्कार सोहळ्याला संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी उपस्थित राहणार
Posted On:
29 FEB 2024 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 29 फेब्रुवारी 2024
ललित कला अकादमीने (संस्कृती मंत्रालय) नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए ) येथे 29 फेब्रुवारी, 2024 रोजी मेळा क्षणचित्रे छायाचित्र स्पर्धेच्या भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. चित्तवेधक छायाचित्रांच्या माध्यमातून भारताचा चैतन्यमयी सांस्कृतिक वारसा साजरा करणाऱ्या मेळा क्षणचित्रे छायाचित्र स्पर्धेसाठी 11,000 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या. देशभरातल्या 300,000 हून अधिक व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संकल्पनेअंतर्गत भारतातील सण आणि परंपरांचे सार चिरंतन करणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.
पुरस्कार सोहळ्याला संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, संस्कृती मंत्रालयातील सह सचिव उमा नांदुरी, आणि अमिता प्रसाद साराभाई, कलाकार, छायाचित्रकार, माध्यम प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
S.Tupe/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2010211)
Visitor Counter : 78