गृह मंत्रालय
सरकारने मुस्लीम कॉन्फरन्स जम्मू अँड काश्मीर(सुमजी गट) आणि मुस्लीम कॉन्फरन्स जम्मू अँड काश्मीर(भट गट) यांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले
Posted On:
28 FEB 2024 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2024
सरकारने मुस्लीम कॉन्फरन्स जम्मू अँड काश्मीर(सुमजी गट) आणि मुस्लीम कॉन्फरन्स जम्मू अँड काश्मीर(भट गट) यांना बेकायदेशीर कारवाया(प्रतिबंध) कायदा(यूएपीए) च्या कलम 3(1) अंतर्गत तात्काळ प्रभावाने 5 वर्षांसाठी बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्स या मंचावर पोस्ट करून सांगितले की दहशतवादी जाळ्यांवर अतिशय कठोरतेने आघात करत सरकारने मुस्लिम कॉन्फरन्स जम्मू आणि काश्मीर (सुमजी गट) आणि मुस्लिम कॉन्फरन्स जम्मू आणि काश्मीर (भट गट) यांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे. देशाची सुरक्षा, एकात्मता आणि सार्वभौमत्व या विरोधात या संघटनांनी आपल्या कारवाया सुरुच ठेवल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी जींच्या सरकारचा दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा निर्धार आहे आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल.”
भारताचे सार्वभौमत्त्व सुरक्षा आणि एकात्मतेबाबत पूर्वग्रहदूषित असलेला मुस्लीम कॉन्फरन्स जम्मू अँड काश्मीर(सुमजी गट) जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे करण्यासाठी बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी आहे आणि दहशतवादी कारवायांना पाठबळ देत आहे. मुस्लीम कॉन्फरन्स जम्मू अँड काश्मीर(सुमजी गट) आणि तिच्या सदस्यांविरोधात बेकायदेशीर कारवाया(प्रतिबंध) कायदा, 1967 सह विविध कलमांतर्गत अनेक गुन्हेगारी प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
भारताचे सार्वभौमत्त्व सुरक्षा आणि एकात्मतेबाबत पूर्वग्रहदूषित असलेला मुस्लीम कॉन्फरन्स जम्मू अँड काश्मीर (भट गट) हा दहशतवादाला पाठिंबा देऊन आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये स्वतःला सहभागी होत जम्मू आणि काश्मीर भारतापासून वेगळे होण्यास प्रोत्साहन, मदत आणि चालना देण्यात गुंतलेला आहे. मुस्लीम कॉन्फरन्स जम्मू अँड काश्मीर (भट गट) आणि तिच्या सदस्यांविरोधात बेकायदेशीर कारवाया(प्रतिबंध) कायदा, 1967 सह विविध कलमांतर्गत अनेक गुन्हेगारी प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2009968)
Visitor Counter : 90