कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
'सचिवालय सुधारणा' अहवालाची जानेवारी 2024 साठीची 10 वी आवृत्ती प्रकाशित
Posted On:
27 FEB 2024 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 27 फेब्रुवारी 2024
प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभागाने (डी. ए. आर. पी. जी.) जानेवारी, 2024 महिन्यातील "सचिवालय सुधारणा" या विषयावरील मासिक अहवालाची 10 वी आवृत्ती प्रकाशित केली आहे. यात 3 उपक्रमांखाली तपशीलवार विश्लेषण केले आहे (1) स्वच्छता मोहीम आणि प्रलंबितता किमान पातळीपर्यंत कमी करणे; (2) निर्णयक्षमता वाढवणे आणि (3) ई-ऑफिस. सर्व मंत्रालये आणि विभागांना लक्षणीय गती मिळणाऱ्या निर्णयप्रक्रियेत कार्यक्षमता वाढवण्याच्या उपक्रमांतर्गत, स्वच्छता संस्थात्मक करण्यासाठी, प्रलंबितता कमी करण्यासाठी आणि विलंब कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांवर अहवालात प्रकाश टाकला आहे. नोडल अधिकाऱ्यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये स्वच्छता मोहिमेसाठी आठवड्यातील 3 तास दिले आहेत.
जानेवारी 2024 या महिन्यातील अहवालाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः
स्वच्छता मोहीम आणि प्रलंबितता कमी करणे.
अ. 4,563 कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली.
ब. 17.02 लाख चौरस फूट जागा मोकळी झाली.
क. भंगाराच्या विल्हेवाटीतून 18.18 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
ड. 4,67,955 लोकांच्या तक्रारीचा निपटारा
निर्णय प्रक्रियेत कार्यक्षमता वाढविण्यासाठी पुढाकार
केंद्रीय सचिवालयात जानेवारी 2021 मधे मार्गी लावायच्या नस्तींचे कामकाज सरासरी 7,19 असायचे ते 2024 मध्ये 4.58 पर्यंत लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
3. ई-ऑफिस अंमलबजावणी आणि विश्लेषण
सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये ई-ऑफिस विश्लेषण डॅशबोर्ड मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला आहे. जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय सचिवालयात तयार केलेल्या एकूण नस्तींपैकी 92 टक्के नस्ती ई-नस्ती आहेत आणि एकूण पावत्यांपैकी 92.73% ई-पावती आहेत. डिसेंबर 2023 मधील 3808 नस्तींच्या तुलनेत जानेवारी 2024 मध्ये आंतर-मंत्रालयीन नस्तींची संख्या 4470 पर्यंत वाढली आहे.
टपाल विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, खाण मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभागातील सर्वोत्तम पद्धती म्हणून 'नोंद खोल्यांच्या देखभालीवर' जानेवारी 2024 च्या अहवालात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. डी. ए. आर. पी. जी. चे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी सर्व नोडल अधिकारी, सर्व मंत्रालये आणि विभागांच्या मासिक बैठकीत मासिक प्रगतीचा आढावा घेतला आणि या मोहिमेची गती फेब्रुवारी 2024 पर्यंत कायम ठेवण्याची विनंती केली.
Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2009373)
Visitor Counter : 111