महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

किशोरवयीन मुलींच्या पोषणात सुधारणा करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय आणि आयुष मंत्रालयातील सहकार्य अधिक बळकट करणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे होणार उद्या आयोजन


5 उत्कर्ष जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींच्या पोषणविषयक स्थितीत सुधारणा करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय आणि आयुष मंत्रालय करणार सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 25 FEB 2024 10:15AM by PIB Mumbai

पारंपरिक ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, संयुक्त योग प्रोटोकॉलद्वारे निरोगी जीवनपद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर पिकवलेल्या आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या सेवनाद्वारे आहारातील विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय आणि आयुष मंत्रालय सहकार्य आणि समन्वयित प्रयत्नांच्या माध्यमातून काम करत आहेत.

हे सहकार्य आणखी जास्त बळकट करण्यासाठी उद्या(26 फेब्रुवारी 2024) विज्ञान भवनात  केंद्रीय महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहारमंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय आयुष आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली  एका राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 5 उत्कर्ष जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींच्या पोषणविषयक स्थितीत सुधारणा करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय आणि आयुष मंत्रालय एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत. महिला आणि बालकांमध्ये समग्र निरामयतेला चालना देण्यासाठी आधुनिक आरोग्य सेवा प्रणाली आणि तंत्रांचा समावेश करून आयुर्वेदासारख्या पारंपारिक 

आरोग्य सेवा प्रणालींच्या सामर्थ्याचा वापर करणे हा या एकात्मिकरण प्रक्रियेचा उद्देश आहे. पारंपरिक विद्वत्ता आणि पद्धतींमध्ये रुजलेल्या पोषणविषयक उपाययोजना महिला आणि बालविकास मंत्रालयाचे अंब्रेला कार्यक्रम असलेल्या सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 चा  एक महत्त्वाचा घटक आहेत. या कार्यक्रमातील उपक्रम आणि धोरणांचा, प्रमुख मंत्रालये आणि विभाग आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने बहु-क्षेत्रीय दृष्टिकोनाच्या माध्यमातून कुपोषणाचा सामना करण्याचा प्रयत्न आहे. वाढ खुंटणे, वजन कमी होणे, रक्तक्षय आणि जन्माच्या वेळी कमी वजन अशा प्रकारचे दोष कमी करण्यासाठी, पोषण 2,0 मधील मध्यवर्ती कार्यक्रम, केवळ कुपोषणाच्या कमतरतेकडेच नव्हे तर मातेचे पोषण, अर्भक आणि  तान्ह्या बालकांना योग्य आहार देण्याचे निकष आणि एमएएम/एसएएम बालकांचे  उपचार यावर देखील लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने आयुषच्या माध्यमातून निरामयतेवर लक्ष केंद्रित करतो. पोषण माह आणि पोषण पखवाडा यांसारख्या राष्ट्रीय समुदाय कार्यक्रमांतर्गत वर्तनात्मक बदलांसाठी महत्त्वाचे उपक्रम देखील आयोजित केले जातात.

***

MI/Shailesh P/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2008776) Visitor Counter : 93