कायदा आणि न्याय मंत्रालय
एक राष्ट्र एक निवडणुकीसंदर्भातील उच्चस्तरीय समितीने आयोजित केलेल्या बैठकीत आपल्या विविध उपक्रमांचा घेतला आढावा
Posted On:
21 FEB 2024 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 फेब्रुवारी 2024
एक राष्ट्र एक निवडणुक म्हणजेच देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भातील मुद्द्याची तपासणी करण्यासाठी आणि त्याबाबत शिफारशी करण्यासाठी भारताचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने (एचएलसी) आज नवी दिल्ली येथे समितीच्या कार्यालयात बैठक घेतली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, पंधराव्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन.के. सिंह, लोकसभेचे माजी महासचिव डॉ. सुभाष सी. कश्यप, आणि माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी या बैठकीला उपस्थित होते. एचएलसीने आपल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2007862)
Visitor Counter : 99