संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘सिंगापूर एअर शो 2024’ साठी सारंग हेलिकॉप्टर प्रदर्शन संघ सज्ज

Posted On: 19 FEB 2024 4:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2024

 

भारतीय हवाई दलाच्या (आएएफ) सारंग हेलिकॉप्टर प्रदर्शन संघाने 18 फेब्रुवारी 2024 रोजी पहिले सराव प्रदर्शन केले होते. यापूर्वी म्हणजे दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी हा संघ सिंगापूरला पोहोचला. रिपब्लिक ऑफ सिंगापूर हवाई दलाच्या (आरएसएफ)  चांगी हवाई तळावरून  या प्रदर्शनासाठी संघ कार्यरत आहे. सिंगापूर एअरशो 20 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होणार आहे. या एअरशोमध्ये जगभरातील हवाई प्रदर्शन करणारे  विविध  संघ सहभागी झाले आहेत. या शोमध्ये अग्रगण्य विमान आणि विमानाची कार्यप्रणाली  निर्माण करणारे तसेच, प्रणाली चालक आपली  उत्पादने प्रदर्शित करणार आहेत.

भारताच्‍या सारंग संघाने यंदाच्या प्रदर्शन कार्यक्रमामध्‍ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल), निर्माण केलेले ध्रुव या प्रगत आणि वजनाने हलक्या हेलिकॉप्टरचे पहिल्यांदाच प्रदर्शन करण्‍यात येणार आहे. तथापि, सारंग संघाने आपले पहिले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन याआधी 2004 मध्ये सिंगापूरच्या चांगी प्रदर्शन  केंद्रामध्‍ये आशियाई एरोस्पेस एअर शोमध्‍ये केले होते.

सारंग संघाकडून यावर्षी सिंगापूर एअरशोमध्ये प्रेक्षकांसाठी चार हेलिकॉप्टरचे प्रदर्शन करण्यात येणार  आहे.  त्‍यानुसार प्रदर्शनामध्ये ध्रुवमध्‍ये असलेली  चपळाई तसेच या हेलिकॉप्टरची यंत्रणा हाताळणा-या भारतीय हवाई दलाच्‍या  वैमानिकांमध्‍ये असलेले उच्च दर्जाचे कौशल्य अधोरेखित होणार आहे.  स्वदेशी बनावटीचे ध्रुव आणि त्याचे अत्याधुनिक, प्रगत विविध प्रकार भारताच्या सर्व लष्करी सेवांमध्‍ये वापरले जात आहेत. सिंगापूर एअर शो  या व्‍यासपीठाचा  वापर करून, त्‍याव्दारे यशस्वी प्रदर्शन करून भारताने संरक्षण क्षेत्रामध्‍ये आत्‍मनिर्भर बनण्‍यासाठी जे कार्य केले आहे, त्‍याची यशोगाथा जगामध्‍ये पोहोचवणे शक्य होणार आहे.

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 2007100) Visitor Counter : 89


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil