राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांना देणार भेट
Posted On:
18 FEB 2024 8:37PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 19 ते 23 फेब्रुवारी 2024 दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांना भेट देणार
19 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती हुतात्मा स्तंभावर पुष्पहार अर्पण करतील आणि सेल्युलर जेल कॉम्प्लेक्स आणि संग्रहालयाला भेट देतील. सेल्युलर जेलमधील लाईट अँड साउंड शो साठीही त्या उपस्थित असतील. नंतर राष्ट्रपती पोर्ट ब्लेअर येथील डॉ. बी.आर. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला भेट देतील आणि त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील.
20 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती इंदिरा पॉइंट आणि कॅम्पबेल बे ला भेट देतील. त्यानंतर त्या सुभाषचंद्र बोस बेटाला भेट देतील आणि लाईट अँड साउंड कार्यक्रमालाही त्या उपस्थिती लावतील.
21 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती पोर्ट ब्लेअरच्या
राज निवास येथे अंदमान आणि निकोबार बेटांच्या पीव्हीटीजी च्या सदस्यांशी संवाद साधतील. त्याच दिवशी, राधानगर किनाऱ्यावर सैन्याने केलेल्या संचलन प्रात्यक्षिकाच्याही त्या साक्षीदार असतील.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2006950)
Visitor Counter : 129