जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे जल जीवन अभियान  आणि स्वच्छ भारत अभियान  -ग्रामीण यासंदर्भात  राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Posted On: 18 FEB 2024 6:44PM by PIB Mumbai

 

पेयजल आणि स्वच्छता विभागाने 16-17 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे जल जीवन अभियान  आणि स्वच्छ भारत अभियान - ग्रामीण (जी) वर राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. वॉश म्हणजेच स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि आरोग्यविषयक स्वच्छता विषयक  ग्रामीण वॉश प्रभागामध्ये शाश्वत उपायांप्रती  एकात्मिक  दृष्टीकोन' सुनिश्चित करण्यासाठी आरेखित केलेल्या, या महत्त्वपूर्ण परिषदेने विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील विविध भागधारकांना विचारांची गतिशील देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतींसाठी एकत्रित करण्याचे कार्य केले. ही परिषद, नाविन्य, सहयोग, शाश्वतता, यासारख्या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करते. ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी आणि स्वच्छताविषयक गंभीर समस्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी हे एक प्रमुख व्यासपीठ बनले आहे. सहभागींनी सर्वोत्तम पद्धती मांडल्या आणि सहयोगी नियोजनाचा शोध घेतला आणि ग्रामीण स्वच्छतेसाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांवर चर्चा केली.

Image

17 फेब्रुवारीला म्हणजेच परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, एसबीएम-जी कार्यक्रम घडामोडी आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या यशांवर लक्ष केंद्रित केले.

या परिषदेत मल गाळ व्यवस्थापन, सांड पाणी व्यवस्थापन, आधुनिकीकरण, द्रव कचरा व्यवस्थापन (एलडब्ल्यूएम), प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (पीडब्ल्यूएम), घनकचरा व्यवस्थापन (एसडब्ल्यूएम), मासिक पाळी विषयक  कचरा व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण पद्धतींचा समावेश करणारी महत्त्वपूर्ण सत्रे आयोजित करण्यात आली.

या परिषदेचे वेगळेपण म्हणजे सर्व विभागांमधील तपशीलवार राज्य सादरीकरणे. या सादरीकरणांनी प्रत्येक राज्याच्या उपक्रमांचे आणि प्रगतीचे बारकाईने निरीक्षण केले ज्यामुळे उत्तम उपक्रमांचे अनुकरण  आणि टिकाऊपणावर चर्चा होऊ शकते.

A person standing at a podiumDescription automatically generated

या आकर्षक स्वरूपामुळे विविध राज्यांच्या प्रतिनिधींमध्ये अर्थपूर्ण संवाद वाढला, ज्यामुळे प्रत्येक प्रदेशातील आव्हाने आणि यशांची सखोल माहिती मिळाली. या परिषदेने अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी, सहकार्यात्मक  प्रयत्नांना वाढवण्यासाठी आणि रुरल वॉश उपक्रमांना पुढे नेण्यासाठी एक अमूल्य जागा प्रदान केली.

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2006943) Visitor Counter : 119
Read this release in: English , Urdu , Hindi