पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील स्पेशालिटी स्टीलसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेमधील गुंतवणुकीच्या संथ प्रगतीचे स्पष्टीकरण


2027-28 पर्यंत पीएलआय योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्याचा पोलाद मंत्रालयाचा प्रयत्न सुरु असून, आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत ₹29,500 कोटी एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे ₹16,000 कोटी गुंतवणूक केली जाणार  

Posted On: 14 FEB 2024 5:16PM by PIB Mumbai

 

स्पेशालिटी स्टीलसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेंतर्गत, 57 सामंजस्य करार कार्यान्वित करण्यात आले आहेत. 29,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला चालना देणेस्पेशालिटी स्टील ग्रेड्सच्या उत्पादनाची 25 मेट्रिक टन अतिरिक्त क्षमता विकसित करणे आणि आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत सुमारे 17,000 लोकांना अतिरिक्त रोजगार उपलब्ध करून देणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि स्पेशालिटी स्टील विभागाची क्षमता विकसित करण्यासाठी भारताच्या औद्योगिक विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा उपक्रम असलेली पीएलआय योजना, जुलै 2021 मध्ये अधिसूचित करण्यात आली होती, या गोष्टीची नोंद घेणे आवश्यक आहे.

स्पेशालिटी स्टील विभागासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या पीएलआय योजनेची सद्यःस्थिती

23 डिसेंबरपर्यंत, निवडक कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षापर्यंत ₹21,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या वचनबद्धतेसह, यापूर्वीच सुमारे ₹12,900 कोटींची गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष’24 मध्ये या कंपन्यांकडून आणखी ₹3,000 कोटी गुंतवणुकीची अपेक्षा आहे, म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत एकूण ₹29,500 कोटींपैकी सुमारे ₹16,000 कोटींची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे.

पोलाद मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ₹10,000 कोटी गुंतवणुकीची अपेक्षा ठेवली आहे. हे देखील नमूद करणे आवश्यक आहे की, 5 केंद्रांमध्ये उत्पादन सुरू झाले आहे आणि या तिमाहीत आणखी 9 केंद्रांमध्ये उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

सामान्यतः, पोलाद क्षेत्रातील गुंतवणुकीचा अपेक्षित कालावधी मोठा असतो आणि तो इतर गोष्टींबरोबरच, विविध उपकरणांच्या खरेदीवर अवलंबून असते, ज्यापैकी बरीच उपकरणे परदेशातून आयात केली जातात. प्रकल्पांमध्ये अपरिहार्य परिस्थितीमुळे विलंब होतो. भू-राजकीय समस्या, अनपेक्षित घटना, नैसर्गिक आपत्ती आणि काही पीएलआय उत्पादनांसाठी बाजारातील बदललेल्या परिस्थितीमुळे पुरवठा साखळीत होणारा विलंब याचाही गुंतवणुकीची गती, टप्पे आणि प्रमाणावर परिणाम होतो.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2006119) Visitor Counter : 99


Read this release in: English , Urdu , Hindi