ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

भारतीय अन्न महामंडळाकडून ( एफसीआय   ) खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत 10,22,907 मेट्रिक टन  गहू आणि 2975 मेट्रिक टन तांदूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध


94,920 मेट्रिक टन 'भारत आटा' चा गहू आणि 13,548 मेट्रिक टन 'भारत चावल' ब्रँडचा तांदूळ निमशासकीय आणि सहकारी संस्थांना वितरित

Posted On: 14 FEB 2024 5:53PM by PIB Mumbai

 

ग्राहक व्यवहार ,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या  अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने  दिनांक 13.06.2023 च्या पत्राद्वारे  खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) च्या माध्यमातून वितरित करण्यासाठी  मान्यता दिली होती. 06.02.2024 पर्यंत, खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत)  द्वारे 10,22,907 मेट्रिक टन गहू आणि 2975 मेट्रिक टन तांदूळ उचलण्यात आला आहे.  भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ बाजारात आणल्याने गहू आणि तांदळाच्या किमतींवरील महागाईवर   प्रतिबंधात्मक प्रभाव पडतो.

किंमत स्थिरतेचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल या अनुषंगाने गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय  गोदामातील साठयातून 50 लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या/प्रक्रियाकर्ते /गहू उत्पादनांच्या उत्पादकांना  खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत)  अंतर्गत ई-लिलावाद्वारे प्रति पॅन कार्ड 300 (मेट्रिक टन) च्या मर्यादेसह गहू देण्यास मान्यता देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे ग्राहक व्यवहार  अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) द्वारे 25 लाख मेट्रिक टन तांदूळ विक्रीला मान्यता दिली आहे.आजपर्यंत गव्हाचे 34 तर तांदळाचे 31 लिलाव झाले आहेत. या लिलावात 16,16,210 मेट्रिक टन गहू आणि 14,07,914 मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला. रास्त सामान्य गुणवत्तेच्या गव्हासाठी रुपये 2150/क्विंटल आणि शिथिल वैशिष्ट्यांअंतर्गत  असलेल्या  गव्हासाठी रुपये 2125/क्विंटल आणि फोर्टिफाइड तांदळासाठी रुपये 2973/क्विंटल आणि एफएक्यू तांदूळासाठी रुपये 2900/क्विंटल राखीव किमतीवर गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 12,07,655 मेट्रिक टन गहू आणि 3877 मेट्रिक टन तांदूळ हे स्वीकारलेले प्रमाण आहे.  भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदूळ विक्रीसाठी लिलाव 28.06.2023 पासून आणि नंतर दर बुधवारी सुरू झाला.

तसेच, खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत 'भारत आटा' आणि 'भारत चावल' ब्रँड अंतर्गत विक्रीसाठी

केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित (एमएससीएमएफएल) यांसारख्या निम-सरकारी आणि सहकारी संस्थांना ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गहू आणि तांदळचे अतिरिक्त वाटप केले आहे. 06.02.2024 पर्यंत, या संस्थांना 94,920 मेट्रिक टन गहू आणि 13,548 मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आले असून त्यापैकी 54,343 मेट्रिक टन गहू आणि 200 मेट्रिक टन तांदूळ उचलण्यात आला आहे.या संस्थांना गहू 1715 रुपये/क्विंटल आणि तांदूळ 18.59 रुपये/किलो दराने दिला जात आहे.या संस्था सर्वसामान्य ग्राहकांना 5किलो/10 किलो पॅकेजमध्ये 27.50/किलो (आटा) आणि 29/किलो (तांदूळ) दराने  विक्री करतील.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2006063) Visitor Counter : 94