ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
‘ई-जागृती’ नावाच्या आधुनिक कॉन्फोनेट सॉफ्टवेअरवर एक दिवसीय क्षमता निर्माण कार्यशाळेत ग्राहक तक्रार निवारणावर चर्चा.
Posted On:
13 FEB 2024 5:13PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहकांच्या तक्रारींचे जलद, माफक खर्चात आणि सुलभ निराकरण करण्यासाठी कॉन्फोनेट सॉफ्टवेअरचे आधुनिकीकरण “ई-जागृती” या पोर्टलमध्ये केले आहे. याच संदर्भात, सर्व भागधारकांना “ई-जागृती” च्या वैशिष्ट्यांची ओळख करून देण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने आज दिल्लीत क्षमता निर्माण कार्यशाळेचे आयोजन केले होते.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 24 डिसेंबर 2023 रोजी आधुनिकीकृत कॉन्फोनेट सॉफ्टवेअर “ई-जागृति” पोर्टलमध्ये लाँच केले होते.
ई-जागृतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एकत्रीकरणामुळे ग्राहक आयोगाकडील ग्राहक तक्रार प्रकरणे कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी आज परिषदेला संबोधित करताना केले. तंत्रज्ञान आणि ई-जागृतीचा वापर करून प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी त्यांनी सर्व संबंधितांना प्रोत्साहित केले. देशातील अनेक ग्राहक आयोगांमध्ये तक्रार निपटाऱ्याचा मासिक दर 100% असल्याचे सांगून रोहित कुमार सिंह यांनी या आयोगाच्या सर्व अध्यक्षांचे आणि निबंधकांचे उत्कृष्ट कामगिरीसाठी अभिनंदन केले.
ई-जागृती पोर्टल सॉफ्टवेअर सर्व स्तरांवर सोपे, जलद आणि अधिक किफायतशीर ग्राहक तक्रार निवारण समाधान प्रदान करते.
ई-जागृती व्यासपीठावर - तक्रार दाखल करणे, ऑनलाइन शुल्क भरणे, सर्व आयोगांद्वारे प्रकरणे निर्विघ्नपणे निकाली काढण्यासाठी केस मॉनिटरींग मॉड्यूल्स, मेटाडेटा आणि कीवर्ड निर्मितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून संग्रहित ग्राहक तक्रारी आणि प्रकरणे किंवा निर्णयांवर स्मार्ट शोध सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा / मशीन लर्निग तंत्रज्ञान वापरून निर्णय, प्रकरणाचा इतिहास आणि इतर तपशीलांच्या ध्वनी मजकूराचे लिखित दस्तऐवजात रूपांतर यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2005742)
Visitor Counter : 115