आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

किलकारी योजनेबाबत ताजी माहिती


किलकारी प्रकल्पअंतर्गत सध्या 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा पुरवली जात आहे

प्रविष्टि तिथि: 09 FEB 2024 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 फेब्रुवारी 2024

 

किलकारी कार्यक्रम ही मोबाईल-आधारित सेवा असून 15 जानेवारी 2016 रोजी डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा उद्देश नवीन आणि गरोदर मातांसाठी गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपन याबाबत थेट संदेश पाठवून त्यांना त्यांच्या नवजात बालकासाठी आरोग्यदायी निवड करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

ही एक ऑडिओ-आधारित सेवा आहे आणि म्हणूनच ग्रामीण भारतातील साक्षरतेशी संबंधित आव्हानांवर प्रभावशाली ठरते. किलकारी आरसीएच पोर्टलमध्ये नोंदणीकृत महिलांना इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स (IVR) द्वारे गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपन याविषयी मोफत, साप्ताहिक, ठराविक वेळेत ऑडिओ संदेश पाठवते. गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून ते मूल एक वर्षाचे होईपर्यंत हे संदेश पाठवले जातात. गरोदर मातेचा डेटा आरसीएच पोर्टलवरून वेब-सेवेमार्फत किलकारी कडे  आणला जातो.

किलकारी प्रकल्प आसाम, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा, आंध्र  प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटे या 18 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा पुरवतो. अलिकडेच 7 फेब्रुवारी, 2024 रोजी, महाराष्ट्र आणि गुजरात या आणखी दोन राज्यांमध्ये किलकारी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2004729) आगंतुक पटल : 256
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी