राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत भारतीय कृषी संशोधन संस्थेचा 62 वा पदवीदान समारंभ
Posted On:
09 FEB 2024 5:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या 62व्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी या समारंभाला संबोधित केले.
देशाचे अन्न सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेने अतुलनीय योगदान दिले आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. या संस्थेने केवळ शेतीशी संबंधित संशोधन आणि विकास कार्यच प्रभावी पद्धतीने केले नाही तर आपल्या संशोधनाचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे देखील सुनिश्चित केले, असे त्या म्हणाल्या. शेतकरी आणि शेतीशी संबंधित समस्यांची आपल्या सर्वांनाच जाणीव आहे, असे त्यांनी सांगितले. अजूनही आपले अनेक शेतकरी बांधव आणि भगिनी गरिबीत राहात आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य भाव मिळेल आणि त्याची गरिबीतून समृद्धीकडे वाटचाल होईल हे सुनिश्चित करून आपल्याला अतिशय तातडीने पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. 2047 मध्ये जेव्हा भारत एक विकसित देश म्हणून उदयाला येईल, त्यावेळी भारतीय शेतकरी या प्रवासाचे प्रणेते असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
S.Bedekar/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004591)
Visitor Counter : 100