रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रवास सुलभ करण्यासाठी तसेच लॉजिस्टिक खर्च , तेल आयात आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेवरील 6 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना दिली मंजुरी


या प्रकल्पांमुळे विभागांची सध्याची लाईन क्षमता वाढेल, परिणामी रेल्वे सेवा सुरळीत होईल आणि वक्तशीरपणा वाढेल तसेच मालडब्यांसाठी मालाच्या चढ-उताराचा वेळ कमी होईल

यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि रेल्वे सेवा सुधारेल

या प्रकल्पांमुळे बांधकामादरम्यान सुमारे 3 कोटी मनुष्यदिवस इतका थेट रोजगार निर्माण होईल.

या प्रकल्पांसाठी अंदाजे खर्च 12,343 कोटी रुपये असून 2029-30 पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे

Posted On: 08 FEB 2024 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 8 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या 6 (सहा) प्रकल्पांना मंजूरी दिली असून एकूण 12,343 कोटी (अंदाजे) रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाना केंद्र सरकार 100% अर्थसहाय्य पुरवणार आहे. मल्टी-ट्रॅकिंग प्रस्तावांमुळे रेल्वेसेवा सुलभ होईल, कोंडी कमी होईल आणि भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक व्यस्त मार्गांवर आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारताच्या संकल्पनेच्या अनुषंगाने हे प्रकल्प असून या प्रांतातील व्यापक विकासाद्वारे ते या भागातील लोकांना "आत्मनिर्भर" बनवतील आणि त्यांच्या रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.

राजस्थान, आसाम, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि नागालँड या 6 राज्यांमधील 18 जिल्हे समाविष्ट असलेल्या या 6 प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळे 1020 किलोमीटरने वाढेल आणि या राज्यांमधील लोकांना सुमारे 3 कोटी मनुष्य-दिवस रोजगार उपलब्ध करून देईल.

हे प्रकल्प मल्टी -मॉडेल कनेक्टिव्हिटीच्या पीएम -गती शक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्यामुळे आणि एकात्मिक नियोजनाद्वारे शक्य झाले असून प्रवासी , माल आणि सेवांच्या वाहतुकीसाठी वेगवान कनेक्टिव्हिटी प्रदान करतील.

S.No.

Name of Section for doubling stretch

Length in (kms.)

Estimates cost (Rs.)

State

1

Ajmer-Chanderiya

178.28

1813.28

Rajasthan

2

Jaipur-Sawai Madhopur

131.27

1268.57

Rajasthan

3.

Luni-Samdari-Bhildi

271.97

3530.92

Gujarat & Rajasthan

4

Agthori-Kamakhya with new Rail cum Road Briedge

7.062

1650.37

Assam

5

Lumding-Furkating

140

2333.84

Assam & Nagaland

6

Motumari-Vishnupuram and

Rail over Rail at Motumari

 

88.81

 

10.87

1746.20

Telangana & Andhra Pradesh

अन्नधान्य, अन्नपदार्थ, खते, कोळसा, सिमेंट, लोखंड, पोलाद, फ्लाय-ॲश, क्लिंकर, चुनखडी, पीओएल, कंटेनर इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमता वृद्धी कामांमुळे अतिरिक्त 87 एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) मालवाहतूक होईल. रेल्वे हे वाहतुकीचे पर्यावरण-स्नेही आणि ऊर्जा कार्यक्षम साधन असल्यामुळे हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि देशाचा लॉजिस्टिक खर्च , तेल आयात आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मदत होईल.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai Image result for facebook icon /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai


(Release ID: 2004237) Visitor Counter : 105