सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम-अजय (PM-AJAY) योजने अंतर्गत झालेली प्रगती

Posted On: 07 FEB 2024 4:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 7 फेब्रुवारी 2024

पीएम-अजय, म्हणजेच प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (पीएम-अजय) ही योजना, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या, अनुसूचित जाती उप-योजना विशेष केंद्रीय सहाय्य (एससीए ते एससीएसपी ), बाबू जगजीवनराम छात्रवास योजना आणि प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना या तीन विद्यमान योजनांचे विलीनीकरण करून तयार करण्यात आली आहे. त्याचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे:

·कौशल्य विकास, उत्पन्न वाढवणाऱ्या योजना आणि इतर उपक्रमांद्वारे अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण करून अनुसूचित जाती समुदायाची गरिबी कमी करणे.

·अनुसूचित जातींचे प्राबल्य असलेल्या गावांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधा आणि आवश्यक सेवांची पूर्तता करून सामाजिक-आर्थिक विकास निर्देशकात सुधारणा घडवणे.

·साक्षरता वाढवणे आणि दर्जेदार संस्थांमध्ये पुरेशा निवासी सुविधा उपलब्ध करून, विशेषत: महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये/ अनुसूचित जाती-जमातींचे वर्चस्व असलेल्या गटांमध्ये, तसेच निवासी शाळांमध्ये पुरेशा निवासी सुविधा देऊन शाळा आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जातींच्या नोंदणीला प्रोत्साहन देणे.

·आवश्यक तेथे, विशेषतः आकांक्षी जिल्ह्यांमध्ये, अथवा अनुसूचित जाती-जमातींचे प्राबल्य असलेल्या प्रभागांमधील दर्जेदार संस्थांमध्ये, तसेच निवासी शाळांमध्ये पुरेशी निवासी सुविधा उपलब्ध करून साक्षरतेची व्याप्ती वाढवणे आणि शाळा आणि उच्च शिक्षणामध्ये अनुसूचित जाती समुदायाच्या नोंदणीला प्रोत्साहन देणे.

मागील 05 वर्षांमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेश सरकारांनी दिलेल्या अहवालानुसार, योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीचा आणि योजनेच्या परिणामांचा तपशील पुढील प्रमाणे:

·आदर्श ग्राम घटकांतर्गत एकूण 29881 गावांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी 6087 गावे आदर्श ग्राम म्हणून घोषित करण्यात आली.

·अनुदान-सहाय्य घटकांतर्गत, रु. 3242.07 कोटी जारी करण्यात आले असून एकूण 850611 लाभार्थ्यांना या मदतीचा लाभ मिळाला.

·वसतीगृह घटकांतर्गत एकूण 85 वसतीगृहे मंजूर झाली असून, 8659 विद्यार्थ्यांना या वसतिगृहांचा लाभ मिळाला.

पीएम-अजय योजनेअंतर्गत आदर्श ग्राम, अनुदान-सहाय्य आणि वसतीगृह असे 03 घटक आहेत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2003526)
Read this release in: English , Urdu , Hindi