अंतराळ विभाग
महिला रोबोट अंतराळवीर "व्योममित्र" इस्रोच्या "गगनयान" या भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या भारताच्या मानवासह पहिल्या महत्वाकांक्षी अंतराळ उड्डाण मोहिमेपूर्वी अंतराळात उड्डाण करणार
Posted On:
04 FEB 2024 5:51PM by PIB Mumbai
महिला रोबोट अंतराळवीर " व्योममित्र " इस्रोच्या महत्वाकांक्षी "गगनयान" मोहिमेपूर्वी अंतराळात उड्डाण करणार आहे. ‘गगनयान’ ही भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाणारी भारताची मानवासह पहिली अंतराळ उड्डाण मोहीम आहे.
नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी " व्योममित्र " मोहीम या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत नियोजित आहे, तर मानवयुक्त मोहीम "गगनयान" पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये होणार आहे, अशी माहिती दिली.
“व्योममित्र” हे दोन संस्कृत शब्दांपासून बनवलेले नाव आहे, “व्योम” (म्हणजे अंतराळ) आणि “मित्र” (म्हणजे मित्र). ही महिला रोबोट अंतराळवीर मॉड्यूल पॅरामीटर्सचे निरीक्षण करण्याची, इशारा जारी करण्याची आणि लाइफ सपोर्ट ऑपरेशन्स चालविण्याच्या क्षमतेने सुसज्ज आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हे सहा पॅनल चालवणे आणि प्रश्नांना उत्तरे देणे यासारखी कामे ही महिला रोबोट अंतराळवीर करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मानवरहित रोबोट उड्डाण “व्योममित्र” या वर्षी तर “गगनयान” पुढील वर्षी प्रक्षेपित केले जाणार आहे.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2002443)
Visitor Counter : 320