वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भारत मंडपम येथे पीएलआय लाभार्थ्यांशी संवाद साधला
विधायक टीका, सल्लामसलत, सहकार्य आणि सहयोगाचे उद्योग जगताकडून स्वागत आहे: पियुष गोयल
भारताला उत्पादनाचे शक्ती स्थळ बनवण्यासाठी सरकार आणि पीएलआय लाभार्थी यांच्यात सहकार्य आणि सहयोग आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
Posted On:
03 FEB 2024 7:06PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी नवी दिल्ली मध्ये भारत मंडपम येथे उत्पादन-आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. संवादादरम्यान, मंत्र्यांनी देशात उत्पादन वाढीसाठी चांगल्या सुविधा निर्माण होण्यासाठी विविध औद्योगिक क्षेत्रांकडून होत असलेल्या विधायक टीकेचे स्वागत केले.
चांगले कामकाज आणि सरकार आणि संबंधित क्षेत्रांमधील समन्वयासाठी विधायक टीका आणि विचार विनिमयाचे स्वागत असून, उपस्थित लाभार्थ्यांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. गोयल पुढे म्हणाले की सरकारला स्वतःचे बंधन आणि निर्बंध आहेत कारण त्यांना कॅग लेखा परीक्षणाचा देखील सामना करावा लागतो. त्यांनी कागद पत्रांच्या पारदर्शकतेबाबत विश्वास व्यक्त केला, जेथे कोणत्याही मंत्र्याकडून अथवा सरकारी अधिकाऱ्याकडून अनियमिततेला वाव नाही. सरकार आणि लाभार्थी आणि त्यांच्यातील सहकार्य कायम ठेवण्यावर भर देत गोयल म्हणाले की, एकमेकांना सहकार्य केल्याने देशाचा फायदा होईल आणि भारताला उत्पादनाचे शक्ती स्थळ बनविण्यासाठी मदत होईल.
केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की पीएलआय योजना लाभार्थींना सरकारी सेवांवर अवलंबून ठेवण्यासाठी नसून, उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याचा उपयोग होईल, जो पुढील दीर्घ प्रवासाला प्राथमिक आधार देईल. “शेवटी स्पर्धा कायम राहील.” यावर त्यांनी भर दिला आणि लाभार्थ्यांनी केवळ देशांतर्गत बाजारपेठेची पूर्तता न करता त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने बाहेरील जगाचा वेध घेण्याचे आवाहन केले. केंद्रीय मंत्री म्हणाले की भारतीय व्यवसायांना जगात ओळख मिळायला हवी, यासाठी त्यांनी उत्पादनाचे प्रमाण वाढवले आहे, ज्यामुळे त्यांना बाजारातील स्पर्धेत टिकून राहता येईल. संवादादरम्यान गोयल यांनी सांगितले की, बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येक पीएलआय लाभार्थींमध्ये यशोगाथा बनण्याची क्षमता आहे, यावर त्यांचा विश्वास आहे.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2002345)
Visitor Counter : 61