इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्राज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांच्या हस्ते सी-एमईटी हैदराबाद येथील ई-कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) चे उद्घाटन

Posted On: 03 FEB 2024 6:44PM by PIB Mumbai

 

सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), म्हणजेच सी-एमईटी ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया (MeitY) अंतर्गत स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे. या संस्थेच्या पुणे, हैद्राबाद आणि त्रिचूर येथे तीन संशोधन आणि विकास प्रयोगशाळा असून, या ठिकाणी अती महत्वाच्या इलेक्ट्रॉनिक सामग्रीच्या विविध पैल्लुंवर लक्ष केंद्रित केले जाते. सी-एमईटी, हैदराबाद प्रयोगशाळा लीप फ्रॉगिंग इलेक्ट्रॉनिक सामग्री आणि धातू आणि मिश्रधातूंसह धोरणात्मक सामग्रीच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे.

देशातील साधन संपत्तीची कार्यक्षमता आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या सौम्य ई-कचरा पुनर्वापर तंत्रज्ञान विकसित करणे, हे सी-एमईटी, हैदराबादच्या प्रमुख कामांपैकी एक आहे. 2019 मधील नोंदीनुसार, भारतात दर वर्षी सुमारे 3.2 दशलक्ष टन इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होतो. यामध्ये सोने, तांबे, पॅलेडियम, चांदी यासारख्या अनेक मौल्यवान धातुंसह, शिसे, कॅडमियम, क्रोमियम, पारा यांसारखे घातक पदार्थ असतात, ज्यामुळे मानवी आरोग्याची भरून न निघणारी हानी होऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्राज्ञान मंत्रालयाचे चे सचिव एस कृष्णन यांच्या हस्ते ई-कचरा व्यवस्थापन सुविधेवरील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) चे उद्घाटन झाले. जयेश रंजन, प्रधान सचिव, IT E&C, GoT; राजेश सिंग, JS&FA, MeitY; डॉ अनिल कुमार सी, सीई आणि एमडी, मेसर्स ग्रीनको; डॉ संदिप चॅटर्जी, जीसी, MeitY; ई मागेश, डीजी, सी-मेट; अशोक कुमार खटवा, CE, CPWD, यावेळी उपस्थित होते.

सी-एमईटी ने सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल अंतर्गत देशात अशा प्रकारचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) स्थापन केले आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स ने पीसीबी, ली आयन बॅटरी, परमनंट मॅग्नेट आणि सी-सोलर सेल इ. यासारखे ई-कचरा पुनर्वापर तंत्रज्ञान विकसित केले आहे. सी-एमईटीने केवळ पुनर्वापराचे तंत्रज्ञान विकसित केले नसून, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया उपकरणे तयार केली आहेत.

यावेळी बोलताना एस कृष्णन यांनी नमूद केले की ई-कचरा व्यवस्थापनाबाबतचा चक्राकार  अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन, संसाधनांची कार्यक्षमता वाढवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, मौल्यवान सामग्रीची पुनर्प्राप्ती आणि आरोग्य विषयक धोके कमी करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल.

त्यांनी नमूद केले की सी-एमईटीने ने ई-कचरा पुनर्वापरासाठी विविध प्रकारचे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकसित करणे आणि व्यावसायिकीकरणासाठी, विविध उद्योगांना ते हस्तांतरित करण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. ई-कचऱ्यापासून मिळालेले साहित्य आगामी सेमीकंडक्टर उद्योगाची पुरवठा साखळी लवचिक करण्यासाठी उपयोगी ठरेल. देशांतर्गत विकसित ई-कचरा पुनर्वापर तंत्रज्ञानामुळे भारताच्या आत्मनिर्भरता आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. सी-एमईटी हैदराबादचे संचालक डॉ. आर. रथीशयांनी उपस्थितांचे स्वागत केले. सी-एमईटी चे शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि विद्यार्थी, CPWD, GoT चे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2002343) Visitor Counter : 112


Read this release in: English , Urdu , Hindi