पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मे 2009 ते नोव्हेंबर 2015 या काळात खतासाठी (युरिया) घरगुती गॅस पुरवठ्याकरिता मार्केटिंग मार्जिनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 01 FEB 2024 1:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 1 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत,1 मे 2009  ते 17 नोव्हेंबर 2015 या काळासाठी  खत युनिटना  (युरिया) घरगुती गॅस पुरवठ्याकरिता मार्केटिंग मार्जिन निश्चित करण्याला मंजुरी देण्यात आली.

ही मंजुरी म्हणजे संरचनात्मक सुधारणा आहे.अतिरिक्त जोखीम आणि  गॅस विपणनाशी संबंधित खर्च याकरिता गॅस विपणन कंपन्यांकडून मार्केटिंग मार्जिन आकारली जाते. याआधी सरकारने 2015 मध्ये युरिया आणि एलपीजी उत्पादकांसाठी  घरगुती गॅस पुरवठ्यावर मार्केटिंग मार्जिन  निश्चित केली होती.

01.05.2009 ते  17.11.2015 या काळात विविध खत ( युरिया ) युनिटनी खरेदी केलेल्या घरगुती गॅस वर दिलेल्या मार्केटिंग मार्जीनसाठी अतिरिक्त भांडवल या मंजुरीमुळे पुरवले जाणार आहे,जे  18.11.2015  पासून आधीच दिलेल्या दरावर आधारित असेल.

आत्मनिर्भर भारत या सरकारच्या दृष्टीकोनाला अनुसरत ही मंजुरी, उत्पादकांना गुंतवणूक वाढवण्यासाठी चालना देईल. वाढीव गुंतवणुकीमुळे खताबाबत  स्वयंपूर्णता येण्यासाठी मदत होणार आहे त्याच बरोबर  गॅस पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या भविष्यातल्या गुंतवणुकीबाबत निश्चितता मिळणार आहे.  

A.Chavan/N.Chitale/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2001169) Visitor Counter : 92