रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मजबूत राष्ट्रीय महामार्ग जाळे उभारण्यासंबंधी भू-तांत्रिक सल्लामसलत सेवांसाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण बरोबर सामंजस्य करार
Posted On:
31 JAN 2024 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2024
मजबूत राष्ट्रीय महामार्ग जाळे उभारण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) बरोबर सामंजस्य करार केला आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या करारांतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला स्थळ-विशिष्ट भू-तांत्रिक सल्लामसलत आणि विस्तृत प्रकल्प अहवाल तपासण्यात मदत करण्यासाठी सेवा प्रदान करेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष कुमार यादव आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे उपमहासंचालक डॉ. सैबल घोष आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या करारानुसार, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विस्तृत भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये प्रदान करणाऱ्या क्षेत्राचा भूवैज्ञानिक नकाशा तयार करणे, रस्त्याच्या उतारावरील स्थिरता अभ्यास तयार करणे आणि त्यानुसार आवश्यक शिफारशी देणे, भूवैज्ञानिकदृष्ट्या दुर्बल क्षेत्र ओळखणे, स्थळ- विशिष्ट उपाय सुचवणे , प्रकल्पातील बोगद्यांचे 3D भूवैज्ञानिक लॉगिंग, आवश्यक आणि संबंधित स्थिरीकरण उपाय यासंबंधी स्थळ- विशिष्ट भू-तांत्रिक सल्लामसलत सेवा प्रदान करेल. याव्यतिरिक्त, जीएसआय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सल्लागारांनी तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालाचे सविस्तर विश्लेषण देखील करेल.
सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करण्यासाठी दोन सरकारी संस्थांमधील सहकार्याचा हा अभिनव उपक्रम, राष्ट्रीय महामार्गांच्या दर्जेदार बांधकामाला बळकटी देण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामुळे महामार्गांचे परिचालन आणि देखभाल सुलभ होईलच, त्याशिवाय, प्रवाशांना सुरळीत आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देखील देईल.
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2001013)
Visitor Counter : 93