संरक्षण मंत्रालय
नियम-आधारित जागतिक व्यवस्थेसाठी भारत-अमेरिका सहकार्य अनेक पटींनी सामर्थ्य वाढवेल : नवी दिल्लीतील इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
'आत्मनिर्भरता' म्हणजे जागतिक व्यवस्थेपासून दूर जाणे नव्हे; तर ती सामायिक सुरक्षा आणि समृद्धीसाठी मित्र देशांच्या सहकार्यावर आधारलेली आहे”
Posted On:
30 JAN 2024 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 30 जानेवारी 2024
अमेरिकेचे भांडवल आणि तंत्रज्ञानाची माहिती भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करू शकते, तर इथली गुंतवणूक अमेरिकन कंपन्यांना उच्च परतावा आणि जोखीम कमी करण्याचा मार्ग प्रशस्त करू शकते , असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. नवी दिल्लीत 30 जानेवारी 2024 रोजी आयोजित इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने (आयएसीसी ) आयोजित केलेल्या 'अमृत काळ - आत्मनिर्भर भारतामध्ये भारत-अमेरिका संबंध बळकट करणे' याविषयावरील परिषदेला ते संबोधित करत होते.
सरकारने सशक्त आणि आत्मनिर्भर ‘नव्या भारताचा ’ पाया रचला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला साकार करण्यासाठी अमेरिकन गुंतवणूक महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे राजनाथ सिंह म्हणाले. दोन्ही देशांसाठी ही लाभदायक स्थिती आहे असे सांगत, भारताची झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था, त्याचा लोकसंख्या लाभांश, कुशल कामगार आणि प्रचंड देशांतर्गत बाजारपेठ हे घटक अमेरिकी कंपन्यांना उच्च परताव्याची हमी देतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी आणि धोरणात्मक स्वायत्तता राखण्यासाठी अमेरिकन व्यवसायांना भारतात गुंतवणूक करून जोखीम कमी करणे आवश्यक असेल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असल्याचे सांगत या दोन्ही देशांनी सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीमध्ये व्यवसाय आणि सामरिक या दोन्ही क्षेत्रात एकत्र वाटचाल करणे आवश्यक आहे असे राजनाथ सिंह म्हणाले. “भारत आणि अमेरिका मुक्त, खुल्या आणि नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे समर्थन करतात. यामुळे, आमच्या धोरणात्मक हितसंबंधांमध्ये बरीच समानता आहे. याशिवाय, आमचे आर्थिक संबंध दोन्ही देशांसाठी लाभदायक अशा स्थितीत असून उभय देशांमधले वर्तमान संबंध सामायिक मूल्ये आणि सामान हितसंबंधांच्या दुहेरी समरूपतेवर आधारलेले आहेत ही हे संबंध दीर्घकाळ टिकून राहण्याची आणि दृढ करण्याची हमी आहे,”असे त्यांनी सांगितले.
सध्या काळाची गरज ओळखून भारत आणि अमेरिका संरक्षण तंत्रज्ञान आणि अंतराळ यासह विविध क्षेत्रात एकत्र काम करत आहेत, याची संरक्षण मंत्र्यांनी प्रशंसा केली. त्यांनी संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार उपक्रमाचा विशेष उल्लेख केला या उपक्रमाच्या माध्यमातून दोन्ही देश संरक्षण तंत्रज्ञान सहकार्य आणखी बळकट करण्याच्या दिशेने काम करत आहेत.इस्रो आणि नासा यांच्या ' निसार (NISAR)'या संयुक्त उपक्रमामुळे पृथ्वी विज्ञान, आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान बदल यासारख्या अनेक क्षेत्रात सहकार्य सुनिश्चित होणार आहे, असे ते म्हणाले.
“भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि अमेरिका ही दुसरी मोठी लोकशाही आहे. जेव्हा दोन मोठ्या लोकशाही एकमेकांना सहकार्य करतात तेव्हा लोकशाही जागतिक व्यवस्था निश्चितपणे मजबूत होते हे जगभरातील नियम-आधारित व्यवस्थेसाठी अनेक पटींनी सामर्थ्य वाढवण्याचे कार्य करेल.आमचे एकत्र काम केवळ आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरेल,” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
राष्ट्र योग्य गतीने पुढे जात आहे यामुळे येणाऱ्या काळात कुठेही अडखळणार नाही, असे आत्मनिर्भर भारत'मागील सरकारचा दृष्टीकोन विशद करताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. आर्थिक वर्षात देशांतर्गत उद्योगांसाठी खरेदी खर्चाच्या 75% संरक्षण भांडवल राखून ठेवणे, ज्यामुळे देशाला संरक्षण उपकरणे निर्यात करणाऱ्या पहिल्या 25 देशांमध्ये स्थान मिळण्यास मदत झाली आहे , असे आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांची यादी त्यांनी सांगितली. “रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्षांचा संरक्षण क्षेत्रावर फारसा परिणाम झालेला नाही. भारत हा एक मजबूत देश बनला असून राष्ट्रीय हित जपण्यासाठी सक्षम आहे आणि जो कोणी वाकड्या नजरेने बघेल चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे,” असे त्यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांनी यावेळी ‘आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट स्पष्ट केले. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट स्वयंपूर्णतेचे जरी असले तरी जागतिक व्यवस्थेपासून अलिप्त राहून भारताला हे उद्दिष्ट पूर्ण करायचे नाही ,असे त्यांनी स्पष्ट केले. त्याऐवजी मात्र देशांशी सहकार्य करण्याची वचनबद्धता असल्याचे ते म्हणाले. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहीम ‘वसुधैव कुटुंबकम’ वर आधारित साहचर्याला प्रोत्साहन देते, यावर त्यांनी भर दिला.
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2000687)
Visitor Counter : 168