ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरित हायड्रोजन प्रकल्पांच्या विकासासाठी एनजीईएल चा महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार; पाच वर्षांत 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित

Posted On: 30 JAN 2024 12:18PM by PIB Mumbai
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीईएल) ने दरवर्षी 1 दशलक्ष टन क्षमतेच्या हरित हायड्रोजन आणि अंतर्निहित घटकांच्या (हरित अमोनिया, हरित मिथेनॉल) विकासासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे, ज्यामध्ये 2 गिगावॅट पंप साठवण प्रकल्पांचा आणि राज्यात 5 GW पर्यंत साठवणुकीसह किंवा साठवणुकीव्यतिरिक्त अक्षय ऊर्जा प्रकल्प विकासाचा समावेश आहे. 
पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्र सरकारच्या हरित गुंतवणूक योजनेचा एक भाग म्हणून या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. करारामध्ये अंदाजे 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.
29 जानेवारी 2024 रोजी एनजीईएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित भार्गव आणि राज्य शासनाचे उपसचिव (ऊर्जा), नारायण कराड यांच्यात हा सामंजस्य करार झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे वर्ष 2032 पर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता निर्मितीचे लक्ष्य आहे.
एनजीईएल ही एनटीपीसीच्या मालकीची उपकंपनी आहे आणि एनटीपीसी च्या अक्षय ऊर्जा प्रवासाचा ध्वजवाहक बनण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. तिची कार्यान्वयन क्षमता 3.4 गिगावॅट पेक्षा अधिक असून 26 गिगावॅटचे निर्धारित उद्दिष्ट आहे ज्यापैकी 7 गिगावॅटबाबत अंमलबजावणी सुरू आहे.
***
SonalT/VasantiJ/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000559) Visitor Counter : 189


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu