विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एस एन बोस यांच्या 100 वर्षांच्या महान कार्यानिमित्त मान्यवरांकडून क्वांटम मेकॅनिक्सच्या उत्क्रांतीची उजळणी

Posted On: 29 JAN 2024 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2024

 

सत्येंद्र नाथ बोस यांनी त्यांच्या चार क्रांतिकारक प्रकाशनांपैकी नवीन क्वांटम मेकॅनिक्ससंदर्भात शेवटचा लेख लिहिल्याच्या ऐतिहासिक घटनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी एकत्र येऊन क्वांटम मेकॅनिक्सच्या उत्क्रांतीची उजळणी केली.

आम्ही क्वांटम मेकॅनिक्समधील दुसऱ्या क्रांतीच्या काळातून जात आहोत आणि मूलभूत विज्ञान आणि त्यात तांत्रिक हस्तक्षेप यांच्यातील दरी संपत असल्याकडे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय सूद यांनी लक्ष वेधले. कोलकाता येथील एस एन बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस (एसएनबीएनसीबीएस) द्वारे आयोजित फोटोनिक्स, क्वांटम माहिती आणि क्वांटम कम्युनिकेशन या 5 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

एकूण 750 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स चार स्तंभांसाठी खर्च केले जात आहेत. आपल्या सर्वांसाठी या नवीन अभियानाचा एक भाग होण्याची ही एक उत्तम वेळ आहे.

सोडवता येण्याजोग्या आणि विस्तृत अनुप्रयोग असलेल्या योग्य समस्या संशोधकांना सोडवाव्या लागतील. क्वांटम सेन्सिंग, सॅटेलाइट-आधारित क्वांटम कम्युनिकेशन्स आणि पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी ही काही क्षेत्रे आहेत ज्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

23 देशांनी राष्ट्रीय क्वांटम अभियानाची स्थापना केली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: क्वांटम अल्गोरिदमच्या क्षेत्रात भारताचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, यावर त्यांनी भर दिला.

100 वर्षांनंतर आपण पाहतो आहोत की मूलभूत विज्ञानाच्या संकल्पना संप्रेषण, संगणन आणि इतर अनुप्रयोगांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लागू केल्या जात आहेत. नॅशनल क्वांटम अभियानाने सामर्थ्य संकलित केल्यामुळे आपल्याला जागतिक स्तरावर योगदान देण्याची  संधी मिळाली आहे. हे अभियान आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र खुले करेल. देशभरात चार अभियान केंद्र  उभारली जातील. प्रत्येक केंद्राने सर्व तांत्रिक तज्ञांना एकत्र आणणे अपेक्षित आहे, यावर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (डीएसटी) सचिव प्रा.अभय करंदीकर यांनी भर दिला.

राष्ट्रीय क्वांटम अभियानाच्या कामकाजाला गती देण्यासाठी सर्व तांत्रिक तज्ञांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने, देशात विकसित झालेल्या स्टार्टअप्स कार्यक्षेत्र आणि देशभरात स्थापन होणाऱ्या चार अभियान केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तज्ञ राष्ट्रीय क्वांटम अभियानामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

देशात संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाऊंडेशनची भूमिका देखील त्यांनी अधोरेखीत केली.

ही आंतरराष्ट्रीय परिषद हा ऐतिहासिक सोहळ्याच्या 100 वर्षांच्या वर्षभराच्या उत्सवाचा पहिलाच कार्यक्रम आहे.

वर्षभर चालणाऱ्या या सोहळ्यात तीन आंतरराष्ट्रीय परिषदा आणि अनेक जनसंपर्क कार्यक्रमांचा समावेश असणार आहे, हे कार्यक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची एसएनबीएनसीबीएस ही स्वायत्त संस्था वर्षभर आयोजित करेल.

सत्येंद्रनाथ बोस यांचा मुख्य लेख 1924 मध्ये आइनस्टाइनने जर्मनमध्ये अनुवादित केल्यानंतर प्रकाशित झाला होता, असे एस.एन. बोस राष्ट्रीय केंद्राच्या संचालक प्रा तनुश्री साहा-दासगुप्ता यांनी सांगितले. विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी,  संशोधन निष्कर्ष सामायिक करण्यासाठी आणि एकमेकांकडून प्रेरणा घेण्यासाठी या कार्यक्रमांमध्ये जगाच्या विविध भागांतून आणि भारतातील विविध राज्यांतील शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि प्रसारमाध्यमे सहभागी होत आहेत, असे त्या म्हणाल्या.

सत्येंद्रनाथ बोस यांच्या क्वांटम सांख्यिकीवरील अग्रगण्य कार्याने बोस-आईनस्टाईन कंडेन्सेशन, क्वांटम सुपरकंडक्टिव्हिटी आणि क्वांटम माहिती सिद्धांतासह आधुनिक क्वांटम तंत्रज्ञानाच्या विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. 1924 मध्ये, बोस यांनी चार क्रांतिकारक प्रकाशनांपैकी शेवटचे लेखन केले ज्यामुळे नवीन क्वांटम मेकॅनिक्स (इतर 1900 मध्ये प्लँक, 1905 मध्ये आइनस्टाईन आणि 1913 मध्ये नील्स बोहर) होते.विश्वातील अर्ध्या मूलभूत अतिसूक्ष्म कणांना बोसॉन (BOSON) हे त्यांचे नाव देण्यात आले आहे.त्यांनी प्लँक कायदा क्रांतिकारक मार्गाने मांडला ज्यामुळे आइन्स्टाईन प्रभावित झाले आणि त्यानंतर त्यांनी सहकार्य करणे सुरू ठेवले.

 

* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000459) Visitor Counter : 105


Read this release in: English , Urdu , Hindi