संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

75 वा प्रजासत्ताक दिन: बिटींग रिट्रीट 2024  भारतीय सूरांच्या निनादासाठी विजय चौक सज्ज

Posted On: 28 JAN 2024 12:11PM by PIB Mumbai

 

75 व्या प्रजासत्ताक दिन समारंभाच्या निमित्ताने 29 जानेवारी 2024 रोजी भव्य रायसीना हिलवरच्या   ऐतिहासिक विजय चौकत , ‘बिटींग रिट्रीटिंगसमारंभात सर्व भारतीय सुरांचा साक्षीदार होईल. भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF) संगीत वाद्यवृंद 31 आकर्षक तसंच पाऊल ठेक्यांवर आधारित भारतीय सुरांची सजावट सशस्त्र दलाच्या अध्यक्ष आणि सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, इतर केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि सर्वसामान्य जनता यांच्यासमोर सादर करतील.

समारंभाची सुरुवात सामूहिक बँडच्या 'शंखनाद' धूनने होईल आणि त्यानंतर 'वीर भारत', 'संगम दूर', 'देशों का सरताज भारत', 'भागीरथी' आणि 'अर्जुन' यांसारख्या चित्तवेधक सुरांच्या पाईप आणि ड्रम बँडचा यात   समावेश असेल. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे बँड इतर सुरावटीसह 'भारत के जवान' आणि 'विजय भारत' वाजवतील.

भारतीय वायूसेना 'टायगर हिल', रिजॉईस इन रायसीना' आणि 'स्वदेशी' या सुरावटी बँडवर वाजवतील तर भारतीय नौदलाचा बँड 'आयएनएस विक्रांत'सह 'मिशन चांद्रयान', 'जय भारती' आणि 'हम तैय्यार हैं' सारख्या अनेक धून वाजवताना प्रेक्षकांना पहायला मिळतील. यानंतर भारतीय लष्कराचा बँड इतर  सुरावटीसह फौलाद का जिगर’, ‘अग्निवीर’, ‘कारगिल १९९९’, ‘ताकत वतनआदि गाणी वाजवणार आहे.

त्यानंतर एकत्रित आलेले बँड 'कदम कदम बढाये जा', ऐ मेरे वतन के लोगों' आणि ड्रमर्स कॉल' वाजवतील. त्यानंतर  सारे जहाँ से अच्छाया सदैव लोकप्रिय असलेल्या धूनने हा कार्यक्रम संपेल.

या सोहळ्याचे प्रमुख संयोजक लेफ्टनंट कर्नल विमल जोशी असतील. लष्कराच्या बँडचे संयोजक सुभेदार मेजर मोती लाल असतील, तर MCPO MUS II एम अँटनी आणि वॉरंट ऑफिसर अशोक कुमार हे अनुक्रमे भारतीय नौदल आणि भारतीय वायूसेनेचे संयोजक असतील. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या बँडच्या संयोजक कॉन्स्टेबल जी डी राणीदेवी असतील.

नायब सुभेदार उमेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिगुल वादक आपल्या सुरावटी सादर करतील आणि सुभेदार मेजर राजेंद्र सिंग यांच्या सूचनेनुसार पाईप्स आणि ड्रम्स बँड आपल्या सुरावटी ऐकवतील.

बिटींग रिट्रीट' चा उगम  1950 च्या दशकाच्या सुरुवातीला झाला जेव्हा भारतीय सैन्याच्या मेजर रॉबर्ट्सने एकत्रित वाद्यवृंदाचे प्रदर्शन करत अनोखा असा स्वदेशी सोहळा सादर केला. या माध्यमांतून लष्करी तळांच्या शतकानुशतकांच्या जुन्या परंपरेचे दर्शन होते, जेव्हा सैन्याचा युद्धविराम झाला, फौजांनी आपली शस्त्रास्त्र म्यान केली, रणांगणातून माघारी आले आणि रिट्रीटच्या धून वाजवत सूर्यास्ताच्या वेळी छावणीत परतले. निशाणे आणि मानके यावेळी पेटीबंद केली जातात आणि ध्वज खाली उतरवले जातात. या सोहळ्यामुळे गतकाळाच्या रम्य आठवणी पुन्हा जागृत होतात.

***

NM/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000221) Visitor Counter : 134


Read this release in: English , Hindi , Urdu