कृषी मंत्रालय
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने विविध सरकारी योजनांचे प्रमुख लाभार्थी असलेल्या 1500 हून अधिक शेतकऱ्यांना दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला उपस्थित राहण्याची दिली संधी
Posted On:
26 JAN 2024 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2024
26 जानेवारी 2024 ला दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 75व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन मोठ्या दिमाखात पार पडले. यातील मान्यवरांच्या यादीत एक महत्त्वाची भर म्हणून, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्या 1500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना संचलन पाहण्याचे निमंत्रण दिले होते. संचालनासाठी निमंत्रित केलेल्या शेतकऱ्यांमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या आणि अशा प्रकारच्या योजनांचे लाभार्थी सहभागी झाले होते. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 25 आणि 26 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या या विशेष निमंत्रितांसाठी 2 दिवसीय कार्यक्रम आणि प्रशिक्षणाचे आयोजन सुद्धा केले होते.
त्यांच्या समृद्ध अनुभवासाठी 25 जानेवारी 2024 रोजी शेतकऱ्यांसाठी कृषी पायाभूत सुविधा निधी, पर ड्रॉप मोअर क्रॉप, पीएमएफबीवाय इत्यादीसारख्या महत्त्वाच्या सरकारी योजना आणि उपक्रमांवरील सर्वसमावेशक प्रशिक्षण सत्र आणि पुसा संकुलाला भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
26 जानेवारी रोजी, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या विशेष निमंत्रितांनी कर्तव्यपथावरील नेत्रदीपक संचलन पाहिले. संचलनानंतर केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि आदिवासी कार्य मंत्री अर्जुन मुंडा यांनी पुसा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि डीएआरई सचिव कैलाश चौधरी आणि आयसीएआर महासंचालक डॉ. हिमांशू पाठक हेही उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्र्यांनी देश घडवण्यात शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. कृषी अर्थसंकल्पात पाचपट वाढ, विक्रमी अन्नधान्य आणि फलोत्पादनात विक्रमी वाढ आणि एमएसपीमध्ये लक्षणीय वाढ यासह महत्त्वाची कामगिरी त्यांनी अधोरेखित केली. पीएम किसान मी पीएमएफबीवाय सारखे सरकारी उपक्रम आणि सेंद्रिय शेतीला चालना देणाऱ्या योजना सरकारची शेतकऱ्यांच्या हिताप्रति बांधिलकी अधोरेखित करतात. .
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1999909)
Visitor Counter : 130