नौवहन मंत्रालय

प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या चित्ररथातून सागरमाला अभियानाच्या माध्यमातून, बंदर-प्रणित विकासाच्या दूरदृष्टीनुसार कार्यसाफल्याचे अभिमानास्पद चित्रण

Posted On: 26 JAN 2024 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जानेवारी 2024

 

भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतील पथसंचलनात, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचा चित्ररथ देखील होता. या चित्ररथात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून, सागरमाला प्रकल्पाच्या माध्यमातून, बंदर प्रणित विकासाविषयीची दूरदृष्टी आणि प्रत्यक्ष उपलब्धी यांची झलक प्रभावीपणे दाखवण्यात आली होती.

स्त्री-पुरुष समानतेविषयीची मंत्रालयाची वचनबद्धता अधोरेखित करत, चित्ररथाच्या पहिल्या भागात गेल्या 9 वर्षांत महिला नाविकांच्या संख्येत उल्लेखनीय 1100 टक्क्यांची वाढ दर्शवण्यात आली होती . तर, 'सागर सन्मान " या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना असलेल्या' नारी शक्ती ड्रायव्हिंग द ब्लू इकॉनॉमी" (स्त्री शक्तीच्या नेतृत्वाखाली नील अर्थव्यवस्थेचा विकास) चे हे प्रतीकच होते.

तर चित्ररथाच्या मध्यभागी, सागरमालाअंतर्गत, आधुनिकीकरण उपक्रमांद्वारे बंदर कार्यक्षमता आणि क्षमतावृद्धी या बाबतची कामगिरी अभिमानाने दर्शवण्यात आली होती. 'अमृतकाळ व्हिजन 2047' अंतर्गत बंदर-प्रणित औद्योगिकीकरण उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याद्वारे बंदरांच्या आसपास औद्योगिक समूह विकसित केले जाणार आहेत, ज्यामुळे, लॉजिस्टिक खर्च कमी होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल.

  

चित्ररथाच्या मागच्या बाजूला, केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ आणि ‘देखो अपना देश’ या योजनांअंतर्गत, दीपस्तंभ आणि क्रूझ पर्यटन विकासासाठी, मंत्रालय करत असलेले प्रयत्न अधोरेखित करण्यात आले होते. ह्या उपक्रमांअंतर्गत, भारताचा समृद्ध सागरी वारसा दाखवला जात आहे, तर दुसरीकडे क्रूझ पर्यटनाला असलेल्या संधी आणि क्षमतांचा उपयोग करून घेतला जात आहे.

"बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, एकविसाव्या शतकातील अपेक्षांच्या अनुरूप, सागरी क्षेत्रात स्त्री शक्तीची ताकद वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे", असे केंद्रीय मंत्री, सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे.  

हा समग्र दृष्टिकोन, जागतिक पातळीवर सागरी क्षेत्र, प्रगती, नवोन्मेष आणि जबाबदार प्रशासकीय नेतृत्वाची भूमिका मांडणारा आहे.

 

* * *

S.Bedekar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999907) Visitor Counter : 71


Read this release in: English , Urdu , Hindi