उपराष्ट्रपती कार्यालय
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
25 JAN 2024 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
आपल्या राष्ट्राच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या आनंदपर्वानिमित्त मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देत आहे.
पंचाहत्तर वर्षांपूर्वी, आपल्या राज्यघटनेच्या शिल्पकारांनी, जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वसमावेशक लोकशाहीची मार्गदर्शक तत्त्वे वास करत असतील, अशा राष्ट्राची कल्पना केली होती. आज, प्रजासत्ताकाच्या अमृतकाळात, आपण आपल्या संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाचे स्मरण करुया ज्यामुळे भारताला उर्वरित मानवतेसाठी आशेचा किरण म्हणून आकार दिला आहे.
प्रजासत्ताकच्या या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त, आपल्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करत असताना, आपण आपल्या संविधानात अंतर्भूत असलेली मुल्ये आणि तत्त्वांप्रती वचनबद्ध होण्याचा पुन्हा एकदा संकल्प करूया, तसेच एक सशक्त आणि अधिक समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी एकजुटीने काम करूया.
उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा हिंदी अनुवाद खालीलप्रमाणे आहे.
75वें गणतंत्र दिवस के शुभ अवसर पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं!
देश के संविधान निर्माताओं ने 75 वर्ष पूर्व एक राष्ट्र का सपना देखा था जहां न्याय, स्वतंत्रता, समानता, बंधुत्व के आदर्श, विश्व के सबसे बड़े और सबसे समावेशी लोकतंत्र को परिभाषित करते हैं। आज अपने गणतंत्र के अमृत काल में उन संघर्षों, बलिदानों और उपलब्धियों को याद करें, जिन्होंने भारत को अखिल मानवता के लिए आशा के पुंज के रूप में स्थापित किया।
आज जब हम अपने गणतंत्र की 75वीं वर्षगांठ के अवसर पर अपनी उपलब्धियों का उत्सव मना रहे हैं, हम अपने संविधान में निहित मूल्यों और मर्यादाओं के प्रति स्वयं को प्रतिबद्ध करें और एक सशक्त एवं समृद्ध भारत के निर्माण के लिए कृत्संकल्प हों।
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999578)