संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दलासाठी 14 जलद गस्ती नौकांसाठी संरक्षण मंत्रालयाचा माझगांव डॉक शिपबिल्डर लि . सोबत 1070 कोटी रुपयांचा करार

Posted On: 24 JAN 2024 6:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जानेवारी 2024

 

भारतीय तटरक्षक दलासाठी  14 जलद गस्ती नौका खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने 24 जानेवारी 2024 रोजी माझगांव डॉक शिपबिल्डर लि.,  मुंबई सोबत करार केला आहे. कराराचे मूल्य 1070.47 कोटी रुपये आहे. या बहुउद्देशीय नौकांची रचना आणि विकास स्वदेशी असेल आणि माझगांव डॉक लि . द्वारे खरेदी  (इंडियन-आयडीडीएम ) श्रेणी अंतर्गत त्यांची बांधणी करण्यात येईल आणि एकूण 63 महिन्यांत वितरित केल्या  जातील.

विविध  उच्च तंत्रज्ञान आणि प्रगत वैशिष्ट्ये आणि उपकरणे तैनात असलेल्या या गस्ती नौका बहुउद्देशीय ड्रोन, वायरलेस नियंत्रित रिमोट वॉटर रेस्क्यू क्राफ्ट लाइफबॉय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता इत्यादींनी सुसज्ज असतील आणि  नवीन युगाच्या बहुआयामी आव्हानांना समोरे जाण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाला अधिक लवचिक आणि धारदार बनवेल. या आधुनिक गस्ती नौका मत्स्योद्योग  संरक्षण आणि देखरेख, नियंत्रण आणि पाळत, तस्करीविरोधी मोहिमा, उथळ पाण्यात शोध आणि बचाव कार्ये, संकटात सापडलेल्या जहाज/विमानांसाठी  मदत, टोइंग क्षमता, सागरी प्रदूषण निवारण दरम्यान मदत आणि देखरेख चाचेगिरी विरोधी मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. या गस्ती नौकांच्या खरेदीचा उद्देश भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढवणे आणि सागरी सुरक्षेकडे सरकारचे  लक्ष केंद्रित करणे हा आहे.

'आत्मनिर्भर भारत' च्या धर्तीवर हा करार देशाच्या स्वदेशी जहाज बांधणीच्या क्षमतेला आणि सागरी आर्थिक घडामोडीना चालना देईल आणि सहाय्यक उद्योगांच्या विशेषत: एमएसएमई क्षेत्राच्या वाढीला बळ देईल. या प्रकल्पामुळे देशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि कौशल्य विकास प्रभावीपणे होईल.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1999217) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi