संरक्षण मंत्रालय
11 x एसीटीसीएम बार्ज प्रकल्पातील दारुगोळा आणि जलतीरासह क्षेपणास्त्राने सुसज्ज (एसीटीसीएम) 5 वा बार्ज एलएसएएम 19 (यार्ड 129) 24 जानेवारी 24 रोजी ठाणे स्थित मे. सूर्यदीप्त प्रोजेक्ट प्रा. लि. येथे नौदलाकडे सुपूर्द
Posted On:
24 JAN 2024 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2024
भारतीय नौदलासाठी ठाणे स्थित मे. सूर्यदीप्त प्रोजेक्ट प्रा. लि. या एमएसएमई ने तयार केलेला दारुगोळा आणि जलतीरासह क्षेपणास्त्रने सुसज्ज (एसीटीसीएम) पाचवा बार्ज एलएसएएम 19 (यार्ड 129) 24 जानेवारी 24 रोजी मे. सूर्यदीप्त प्रोजेक्ट प्रा. लि. येथे नौदलाकडे सुपूर्द करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमांडर व्ही. प्रवीण, एडब्ल्यूपीएस(मुंबई) होते.
11 X एसीटीसीएम बार्ज बांधणीचा करार 5 मार्च 21 रोजी संरक्षण मंत्रालय आणि मेसर्स सूर्यदीप्त प्रोजेक्ट्स प्राइवेट लिमिटेड, ठाणे यांच्यात झाला. या बार्जेसच्या उपलब्धतेमुळे भारतीय नौदलाच्या परिचालन वचनबद्धतेला चालना मिळेल . यामुळे जेटींच्या बाजूने आणि बाहेरील बंदरांवर भारतीय नौदलाच्या जहाजांवर सामान/दारुगोळा चढवणे आणि उतरवणे सुलभ होईल.
हे बार्जेसची रचना स्वदेशी आहे आणि संबंधित नौदल नियम आणि भारतीय नौवहन नोंदणी नियमन अंतर्गत त्यांची निर्मिती केली आहे. नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा, विशाखापट्टणम येथे डिझाईनच्या प्रारंभिक टप्प्यात बार्जची नमुना चाचणी घेण्यात आली. हे बार्ज केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे गौरवशाली पथदर्शक आहेत.
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1999198)
Visitor Counter : 111