पंचायती राज मंत्रालय

गोव्यामध्ये पंचायतींकडे अधिकारांच्या हस्तांतरणाची सद्यस्थिती, या विषयावरील राष्ट्रीय सल्लागार कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 24 JAN 2024 5:12PM by PIB Mumbai

गोवा, 24 जानेवारी 2024

 

भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी आज ‘पंचायतींकडे  अधिकारांच्या हस्तांतरणाची स्थिती’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय सल्लागार कार्यशाळेचे उद्घाटन केले. भारतीय लोक प्रशासन संस्थेने (IIPA) केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या सहयोगाने ही परिषद आयोजित केली आहे.

आपल्या उद्घाटन भाषणात सचिव विवेक भारद्वाज यांनी, पंचायतींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी सामायिक दृष्टी, समान ध्येय आणि सहयोगी कृतीवर भर दिला. डेव्होल्यूशन इंडेक्स (हस्तांतरण निर्देशांक) या विषयावरील चर्चेला प्राधान्य द्यायला हवे, असे त्यांनी सूचित केले. पंचायतींकडून अपेक्षित कामांची पूर्तता व्हावी, यासाठी त्यांचा आर्थिक आणि मनुष्यबळानुसार विकास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “पंचायतींना सक्षम करणे आणि पंचायती राज व्यवस्था मजबूत करणे हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित नसून, यामधून स्वावलंबन आणि शाश्वततेचे संवर्धन अपेक्षित आहे. स्वयंपूर्ण पंचायत, ही आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या उभारणीमधील आधारशिला आहे”, सचिव म्हणाले.  

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी ‘पंचायतींकडे  अधिकारांच्या हस्तांतरणाची स्थिती’ या विषयावरील सत्र आणि ‘पंचायातींकडे काम आणि निधीचे हस्तांतरण’ या विषयावरील अनुभव कथनाची दोन सत्रे झाली.

हस्तांतरणाच्या सहा पैलूंवर चर्चा झाली. यामध्ये हस्तांतरणाची चौकट, कार्यपद्धती, वित्त पुरवठा, कार्यकर्ते, क्षमता विकास आणि उत्तरदायित्व या मुद्द्यांचा समावेश होता.

उद्घाटन सत्राला भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार, आयआयपीए चे डीजी एस. एन. त्रिपाठी, आणि आयआयपीए चे प्राध्यापक डॉ. व्ही. एन आलोक, राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या पंचायत राज विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, पंचायत राज मंत्रालय, नीती आयोग, आरबीआय चे वरिष्ठ अधिकारी, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, वरिष्ठ संशोधक आणि आयआयपीए चे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

* * *

PIB Panaji | R.Aghor/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1999173) Visitor Counter : 71


Read this release in: English , Urdu , Hindi