युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या दुसऱ्या दिवशी दोन सुवर्णपदके जिंकून दिल्लीने घेतली दुसऱ्या स्थानावर झेप
Posted On:
21 JAN 2024 8:44PM by PIB Mumbai
तामिळनाडूत चेन्नई इथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये आज रविवारी दुसऱ्या दिवशी यजमान तामिळनाडू आणि दिल्ली संघांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके पटकावली. तर, पंजाब गुजरात,चंदीगड, आणि मणिपूर यांनी आपल्या पदक तालिकेत प्रत्येकी एका सुवर्णपदकाची भर घातली. दुसऱ्या दिवस अखेर तामिळनाडू 4 सुवर्ण आणि 2 रौप्य अशा एकूण 6 पदकांसह पहिल्या स्थानावर, तर महाराष्ट्र 3 रौप्य आणि 6 कांस्य अशा एकूण 9 पदकांसह आठव्या स्थानावर आहे
फेन्सिंग क्रीडा प्रकारात फॉइलच्या अंतिम फेरीत मणिपूरच्या के अभिनाश कडून 15-9 असा पराभूत झालेल्या महाराष्ट्राच्या तेजस पाटीलने मुलांच्या गटात रौप्य पदक पटकावले, तर याच प्रकारात रोहन शहाने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले. मुलांच्या कबड्डी स्पर्धेत गतविजेत्या हरयाणाने महाराष्ट्रावर 45-28 असा विजय मिळवत अंतिम फेरीत राजस्थान विरुद्ध आपले स्थान निश्चित केले.
बास्केटबॉल मध्ये महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने अ गटात केरळ वर 81-54 अशी मात केली. ज्युदो मध्ये मुलींच्या 48 किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या भक्ती भोसलेने कांस्यपदक मिळवले,तर मुलांच्या 50 किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या मोहित मूल्यने रौप्यपदकाची, तर मुलांच्या 55 किलो वजनी गटात ओम समीरने कांस्यपदकाची कमाई केली.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1998462)
Visitor Counter : 129