महिला आणि बालविकास मंत्रालय
दावोस येथे 15-19 जानेवारी 2024 दरम्यान झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत भारताकडून “जागतिक कल्याण -लिंग समानता आणि समतेसाठी आघाडीची घोषणा
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2024 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 19 जानेवारी 2024
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे 15-19 जानेवारी 2024 या कालावधीत झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत, भारत “वसुधैव कुटुंबकम” च्या भावनेने सहभागी झाला जी यावर्षीची जागतिक आर्थिक मंचाची संकल्पना "विश्वास पुनर्स्थापित करणे " शी अनुरूप असून जागतिक सहकार्याद्वारे सामायिक भविष्याला आकार देण्यास सज्ज आहे.
जागतिक आर्थिक मंच 2024 मध्ये, भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी, यांनी केले. त्यांच्यासोबत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, डीपीआयआयटी सचिव आर के सिंग आणि भारत सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी होते .
जागतिक आर्थिक मंचाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जागतिक आर्थिक मंच आणि भारत सरकारद्वारा समर्थित "जागतिक कल्याण -लिंग समानता आणि समतेसाठी आघाडीची घोषणा" ही प्रमुख उपलब्धी होती.
या आघाडीची कल्पना जी 20 नेत्यांचे घोषणापत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे महिला-प्रणित विकासाप्रति भारताच्या ठाम वचनबद्धतेतून उदयाला आली.
महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणूक, जागतिक सर्वोत्तम पद्धती, ज्ञानाची देवाणघेवाण, हे या नवीन आघाडीचे प्राथमिक आणि स्पष्ट उद्दिष्ट आहे.
ही आघाडी मोठ्या जागतिक समुदायाच्या फायद्यासाठी जी 20 नेत्यांच्या वचनबद्धतेसह जी 20 आराखडा अंतर्गत उपक्रम आणि प्रतिबद्धता गटांबरोबरच उद्योग 20, महिला 20 आणि जी 20 सक्षमीकरण उपक्रमांचा पाठपुरावा करेल.
S.Kakade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1997951)
आगंतुक पटल : 468