अर्थ मंत्रालय
16 व्या वित्त आयोगासाठी पदांच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
18 JAN 2024 12:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 व्या वित्त आयोगासाठी संयुक्त सचिवांच्या स्तरावर तीन पदांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे, ज्यात दोन पदे संयुक्त सचिव आणि एक आर्थिक सल्लागार पदाचा समावेश आहे. 31 डिसेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेद्वारे संविधानाच्या कलम 280 नुसार ही पदे तयार करण्यात आली आहेत.
आयोगाला त्याचे कामकाज पार पाडण्यात मदत करण्यासाठी नव्याने निर्माण केलेल्या पदांची आवश्यकता आहे. आयोगातील इतर सर्व पदे यापूर्वीच प्रतिनिधी अधिकारांनुसार निर्माण करण्यात आली आहेत.
Jaydevi PS/V.Joshi/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1997322)
Visitor Counter : 130