वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
ट्रेड कनेक्ट ई- प्लॅटफॉर्म वरील कामाच्या प्रारंभाबाबत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा
Posted On:
16 JAN 2024 7:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 16 जानेवारी 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे पुनर्रचित व्यापार मंडळाची दुसरी बैठक झाली. भारतीय निर्यातदार आणि उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यापारातील विविध भागधारकांशी जोडण्याची सुविधा प्रदान करणारा मध्यस्थ मंच, ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मवर काम लवकरच सुरू होईल, अशी घोषणा त्यांनी केली.
ह्या ई-प्लॅटफॉर्म द्वारे, नव्या आणि उदयोन्मुख निर्यातदारांना सुविधा प्रदान केली जाण्याची अपेक्षा असून, त्यावर, बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठीचे विविध नियम, क्षेत्रे, निर्यातीचे कल, मुक्त व्यापार कराराअंतर्गत लाभ मिळवण्याचे सुलभ मार्ग, तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी भारत सरकार आणि संबंधित संस्थांमधील अधिकाऱ्यांना व्यापाराशी संबंधित प्रश्न सोडवण्याच्या सुविधेसह क्षेत्रनिहाय कार्यक्रमांमध्ये प्रवेश, यांचा समावेश असेल. हा प्लॅटफॉर्म येत्या 3-4 महिन्यांच्या कालावधीत तयार होण्याची अपेक्षा आहे.
ट्रेड बोर्डाची ही बैठक, महत्वाच्या मुद्यांवर विचारमंथन करण्याची संधी आहे, ज्यात मुक्त व्यापार कराराचे लाभ घेण्यासह, स्टार्ट अप्स/एमएसएमई उद्योगांना सीमापार कसे प्रोत्साहन द्यायचे आणि निर्यात सुरू करणे, देशातील निर्यातवृद्धीला चालना देण्यात महत्वाचा वाटा असलेल्या निर्यातीला प्रोत्साहन देणाऱ्या सेवा क्षेत्रातील निर्यातीला बळ देणे यासाठी ही बैठक उपयुक्त आहे.
उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याच्या गरजेवर गोयल यांनी भर दिला. भारतीय निर्यातीला गती देण्यात राज्ये, केंद्र आणि उद्योग सर्व समान भूमिका बजावत असताना निर्यातीला लोकचळवळ बनवण्यावर त्यांनी भर दिला.
अधिक निर्यात साध्य करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणी प्रक्रियेत योगदान देण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी बजावलेल्या सक्रिय भूमिकेवरही त्यांनी भर दिला. सहभागींनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे हाताळले जातील आणि आजच्या बैठकीत त्यांनी केलेल्या सूचनांवर संबंधितांकडून विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यांच्या मंत्र्यांनी बैठकीत मध्यस्थी करून, त्यांच्या राज्य-विशिष्ट सूचना दिल्या आणि बाह्य व्यापाराला चालना देण्यासाठी अनुकूल व्यवस्था निर्माण करण्याची वचनबद्धता देखील त्यांनी व्यक्त केली.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1996747)
Visitor Counter : 128