ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

बांधकामात सुरक्षितता, सुलभता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय मानक ब्युरोने 'प्रमाणीकृत विकास आणि इमारत विनियम, 2023' केले जारी


हे नियमन भारतीय राष्ट्रीय इमारत संहिता 2016 शी (एनबीसी 2016) संलग्न असून यासाठी जगातल्या सर्वोत्तम पद्धतींपासून प्रेरणा घेण्यात आली आहे

Posted On: 16 JAN 2024 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2024

भारतीय मानक ब्यूरोने विशेष प्रकाशन SP 73: 2023 मध्ये प्रमाणीकृत  विकास आणि इमारत विनियम, 2023' प्रकाशित केले आहेत. विशेष प्रकाशन  देशाच्या बांधकाम क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे.

हे नियमन भारतीय राष्ट्रीय इमारत संहिता 2016 शी (एनबीसी 2016) संलग्न असून  जगातल्या सर्वोत्तम पद्धतींपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेले हे नियमन बांधकाम क्षेत्रात सुरक्षा, सुलभता आणि टिकाऊपणाच्या सुनिश्चितीसाठी व्यापक आराखडा पुरवते. संबंधित दस्तऐवज एकसंधतेचे उत्तम उदाहरण असून राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्या बांधकाम विकास व निर्माण नियमांची संरचना व तपशील यात एकसंधता आणण्यासोबतच राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या विनिर्दिष्ट गरजांचा विचारही यात करण्यात आला आहे.

या दस्तऐवजाचा लाभ होणारे प्रमुख संबंधित :

या दस्तऐवजाचे प्रमुख लाभार्थी पुढीलप्रमाणे :

a गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय  आणि  त्या अंतर्गत नगर आणि ग्राम  नियोजन संस्था (टीसीपीओ );
b . राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे;
c . शहरी आणि ग्रामीण स्थानिक संस्था  
d . विकास प्राधिकरणे ;
e.   कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पोर्ट ट्रस्ट;
f.  जिल्हा आणि ग्रामपंचायती; आणि
g.  बांधकाम विकास परिसंस्थेशी संबंधित  इतर संस्था

सुलभता

दस्तऐवज समजून घेणे, स्वीकारणे, अंमलबजावणी करणे आणि अनुपालन  सोपे व्हावे याच्या सुनिश्चितीसाठी  त्याचा मसुदा तयार करताना अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत, त्यापैकी काही खाली दिल्या आहेत:

a. विकास प्रक्रिया ज्या क्रमाने होते त्यानुसार बहुतांश करून अध्याय आणि दस्तऐवजाची रचना सर्वांगीणपणे करण्यात आली आहे. यामुळे खंडात सातत्य दिसून येते.

b. मुख्य ठळक बाबींच्या स्वरूपात वापरकर्त्यांना त्यातील मजकुराची माहिती देण्यासाठी प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला स्पष्टीकरणात्मक नोट्स रेखांकित केल्या आहेत.

c. दस्तऐवजात सुलभतेसाठी आणि नियम नीट कळण्यासाठी प्रमाणित पद्धतीनुसार घटक, कलम, उपकलम, तक्ते, आकृत्या, संलग्नक, इत्याद क्रमबद्ध केले आहेत .

d. नियमनांच्या स्पष्टीकरणाची दृश्यमानता ठळक करण्यासाठी आवश्यक तिथे आकडेवारी, फ्लोचार्ट्स देण्यात आले आहेत.

e नियमनांचे लेखन अशा पद्धतीने करण्यात आले आहे की त्यातून वेगवेगळे अर्थ काढण्यास वाव राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारची संदिग्धता राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

f. जेथे जेथे एखाद्या कलमाचा अर्थ लावताना संदिग्धता निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा नियमाला अपवाद आहे, तेथे ते स्पष्ट करण्यासाठी टिपा देण्यात  आल्या आहेत.

g. सुरक्षा, टिकाऊपणा आणि सुलभता संबंधित एनबीसी 2016 च्या प्रमुख तरतुदी कार्यान्वयन सुलभतेच्या सुनिश्चितीसाठी विशेषत्वाने अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

h. उपलब्ध मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमन लक्षात  घेऊन भू विकास आणि बांधकाम निर्माण या क्षेत्राशी संबंधित नवीनतम बाबी आणि घडामोडी यांचा विचार करण्यात आला आहे.

नियामक संस्था अधिक पारदर्शकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करतील, नोंदणीकृत बांधकाम व्यवसायिकांद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सेवांपर्यंत पोहोच सुलभ होईल, अशा भविष्याची संकल्पना दस्तऐवजात मांडण्यात आली आहे.

 


S.Kane/S.Kakade/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 

 



(Release ID: 1996670) Visitor Counter : 94


Read this release in: English , Urdu , Hindi