वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
डीपीआयआयटी द्वारे 10 ते 18 जानेवारी 2024 दरम्यान स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे आयोजन
Posted On:
12 JAN 2024 3:02PM by PIB Mumbai
स्टार्टअप इंडियाची 8 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त, 10.01.2024 रोजी स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देणाऱ्यांच्या सहयोगाने, ‘स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताह 2024’, ‘आस्क मी एनीथिंग’ (AMA), अर्थात कोणताही प्रश्न विचारा, या सत्रासह सुरू झाला. भारतातील उद्योजकतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी, 10 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत संबंधित भागधारकांसह आभासी माध्यमातून ‘आस्क मी एनीथिंग (AMA)’ ची आठ थेट सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. 10 जानेवारी 2024 रोजी, आयोजित करण्यात आलेले आस्क मी एनीथिंग सत्र, ‘इन्क्यूबेटरद्वारे नवोदित स्टार्टअप्ससाठी संधी’ यावर केंद्रित होते. यावेळी स्टार्टअप्स आणि उद्योजकांना बीज भांडवलासाठी निधी उपलब्ध असलेल्या विविध मार्गांची माहिती देण्यात आली. या सत्रात एखाद्या कल्पनेच्या सुरुवातीपासून, ते शेवटी बाजारात प्रवेश करण्यापर्यंतच्या, स्टार्टअपच्या प्रवासाच्या विविध टप्प्यांवर मोलाचे मार्गदर्शन देखील करण्यात आले. ट्विटर, लिंक्डइन आणि फेसबुकसह स्टार्टअप इंडिया सोशल मीडिया चॅनेलवर या सत्राचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. पुढील लिंकवर ते पाहता येईल:
https://www.youtube.com/watch?v=hM36ZJA_5ZI.
नवोदित उद्योजकांसाठी MAARG मेंटॉरशिप सिरीज (मार्गदर्शन मालिका) अंतर्गत पहिले मार्गदर्शन सत्र, ‘आयडिया टू एक्झिक्युशन - बिल्डिंग अ सॉलिड बिझनेस प्लॅन’, अर्थात ‘कल्पनेपासून अंमलबजावणी पर्यंत- व्यापार योजना तयार करणे’, या विषयावर केंद्रित होते.
या सत्रात विविध आव्हानात्मक प्रसंगांना कसे हाताळता येते, हे प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्ट करून एखादी उद्योजकीय कल्पना सुनियोजित व्यवसायाच्या योजनेत कशी परिवर्तित करता येते, या प्रक्रियेचा दृष्टीकोन स्पष्ट करण्यात आला. उदयोन्मुख उद्योजकांसाठी हे सत्र माय भारत पोर्टलवर देखील आयोजित करण्यात आले होते.
तसेच, ‘स्टार्टअप शाळा’ हा स्टार्टअप इंडियाचा पथदर्शी प्रवेगक कार्यक्रम गुणवत्ता वर्धनाच्या टप्प्यावर स्टार्टअप्सच्या व्यापक सहयोगासाठी सुरू करण्यात आला. हा उपक्रम सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअपसाठी 3-महिन्यांचा प्रवेगक कार्यक्रम आहे ज्यायोगे त्यांना आवश्यक गुणवत्ता वर्धनासाठी ज्ञान, नेटवर्क, निधी किंवा मार्गदर्शन मिळावे. प्रत्येक कार्यक्रम समूह एका विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल, पहिले स्वच्छ-तंत्रज्ञान क्षेत्र असेल. 10 जानेवारी 2024 पासून स्टार्टअप इंडिया पोर्टलवर प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
देशभरात भारतीय नवकल्पनांचा उत्सव साजरा करत, इन्क्युबेटर्सनी त्यांच्या केंद्रांवर स्टार्टअपशी संबंधित कार्यक्रमही आयोजित केले. 10 जानेवारी 2024 रोजी, 7 वेगवेगळ्या राज्यांमधील 9 शहरांत अशा 9 आकर्षक कार्यक्रमांचे प्रत्यक्ष आयोजन करण्यात आले. 845 हून अधिक उद्योजक आणि विद्यार्थी उद्योजक कार्यक्रमांना उपस्थित होते. कार्यक्रमांद्वारे स्टार्टअप प्रदर्शन, मार्गदर्शन सत्रे आणि आकर्षक पॅनेल चर्चा आदि संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.
देशभरातील नवोन्मेषाचे प्रदर्शन करत, 9 राज्यांमधील 12 शहरात 14 कार्यक्रम प्रत्यक्षरित्या भरवण्यात आले. कार्यक्रमांमध्ये स्टार्टअप्सचा सक्रिय सहभाग दिसून आला आणि उद्योजकांनी कार्यक्रमांना हजेरी लावली. कार्यक्रमात विद्यार्थी उद्योजकांसाठी आयडियाथॉन, महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सचे प्रदर्शन आणि डीपटेक फ्रंटियर्स आणि आयपीआर रणनीतींचा धांडोळा घेण्यासाठी पॅनेलचा समावेश होता.
परिसंस्था सक्षमकर्त्यांसह अधिक दृष्टिकोनात्मक आस्क मी एनीथिंग सत्रे आणि मार्ग मार्गदर्शन शृंखले अंतर्गत सत्रे आठवड्याभरात नियोजित आहेत. कार्यक्रमाचे नियोजित वेळापत्रक https://www.startupindia.gov.in/innovation-week/ वर पाहता येईल.
***
S.Bedekar/R.Agashe/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1995587)
Visitor Counter : 143