कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीएआरपीजीद्वारे डिसेंबर 2023 साठी  केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या सीपीजीआरएएमएस वरील  कामगिरीचा 20 वा अहवाल प्रकाशित


डिसेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रालये/विभागांनी एकूण 1,09,851 तक्रारींचे केले निवारण

Posted On: 12 JAN 2024 12:35PM by PIB Mumbai

 

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी) ने डिसेंबर, 2023 साठी  केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण व देखरेख प्रणाली (सीपीजीआरएएमएस) मासिक अहवाल जारी केला आहे. हा अहवाल  सार्वजनिक तक्रारींचे प्रकार व  श्रेणी आणि निकालाचे स्वरूप यांचे तपशीलवार विश्लेषण प्रदान करतो. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचा  केंद्रीय मंत्रालये/विभागांवरील हा 20 वा अहवाल आहे.

कार्मिक, सार्वजनिक तक्रारनिवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे   राज्यमंत्री  डॉ. जितेंद्र सिंह यांनी 19 डिसेंबर 2023 रोजी सुशासन सप्ताह 2023 च्या उद्घाटन समारंभात  सीपीजीआरएएमएस  वार्षिक अहवाल 2023 आणि  सीपीजीआरएएमएस   मोबाइल अॅपचे  अनावरण  केले होते.

सीपीजीआरएएमएस पोर्टलवर सीएससीच्या(सामान्य सेवा केंद्र) माध्यमातून  2023 या वर्षात  सुमारे 98 हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. डिसेंबर 2023 मध्ये सामान्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून  एकूण 6,976 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2023 पासून,सीएससीने सीपीजीआरएएमएसची पोहोच  वाढवण्यासाठी आणि सर्वात दूरच्या नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी  महिन्याच्या प्रत्येक 20 तारखेला  सीएससी-सीपीजीआरएएमएस  दिवस आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.

डिसेंबर, 2023 मधील प्रगतीवरून  केंद्रीय मंत्रालये/विभागांनी 1,09,851 तक्रारींचे निवारण केल्याचे सूचित होते. केंद्रीय मंत्रालये/विभागांमध्ये 2023 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत  तक्रार निकाली काढण्याचा सरासरी कालावधी  19 दिवस आहे. हे अहवाल 10 कलमी  सीपीजीआरएएमएस सुधारणा प्रक्रियेचा भाग आहेत ज्याचा अवलंब प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने तक्रार निकाली काढण्यासंदर्भातील  गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि कालावधीची मर्यादा कमी करण्यासाठी केला होता.

डिसेंबर 2023 मध्ये, बीएसएनएल  फीडबॅक कॉल सेंटरने 89017 फीडबॅक(अभिप्राय ) संकलित  केले. संकलित केलेल्या एकूण अभिप्रायांपैकी,  ~42%   नागरिकांनी त्यांच्या संबंधित तक्रारींचे निराकरण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.  बीएसएनएल  फीडबॅक कॉल सेंटरद्वारे केंद्रीय मंत्रालये/विभागांसाठी 53,344 अभिप्राय  (60%) संकलित  करण्यात आले.

 

तक्रारनिवारण अपील 

डिसेंबर 2023 मध्ये 19568 अपील  प्राप्त झाली   आणि 18617  निकाली काढण्यात आली. केंद्रीय सचिवालयाकडे डिसेंबर 2023 अखेर 20841 तक्रारनिवारण अपील   प्रलंबित आहेत

 

सीपीजीआरएएमएस  पोर्टलवर नागरिक नोंदणी

डिसेंबर 2023 मध्ये, 0.34 लाख नागरिकांनी  सीपीजीआरएएमएस   पोर्टलवर नोंदणी केली आहे आणि जानेवारी-डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 2.75 लाख नागरिकांनी  सीपीजीआरएएमएस   पोर्टलवर नोंदणी केली आहे.

 

तक्रार निवारण मूल्यांकन आणि निर्देशांक (जीआरएआय ) डिसेंबर, 2023

  • सहकार मंत्रालयभारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालय  आणि अन्न व  सार्वजनिक वितरण विभाग हे डिसेंबर, 2023 साठी गट '' अंतर्गत तक्रार निवारण मूल्यमापन आणि निर्देशांकात सर्वोत्तम  कामगिरी करणारे ठरले.
  • पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, विधिविषयक बाबी  विभाग आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय डिसेंबर, 2023 साठी गट 'बी' अंतर्गत तक्रार निवारण मूल्यमापन आणि निर्देशांकात सर्वोत्तम कामगिरी करणारे ठरले.

***

N.Chitale/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1995477) Visitor Counter : 96


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi