शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गांधीनगर येथे आयोजित 'भविष्यासाठी कार्यबल उभारणी: उद्योग 4.0 साठी कौशल्य विकास' या विषयावरील सत्राच्या उदघाटन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती


2047 पर्यंत ‘विकसित भारत’ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने, विशेषतः तरुणांनी योगदान द्यावे - धर्मेंद्र प्रधान

Posted On: 11 JAN 2024 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 11 जानेवारी 2024

गुजरातमधील गांधीनगर येथे महात्मा मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन केंद्र येथे सुरू असलेल्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद  2024 मध्ये आयोजित 'भविष्यासाठी कार्यबल उभारणी: उद्योग  4.0 साठी कौशल्य  विकास' या विषयावरील सत्राच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. या सत्राला उद्योजक, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, गुजरात सरकारचे अधिकारी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.

राष्ट्रीय प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी देशाची  विकासयात्रा प्रतिबिंबित होण्यासाठी  व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद  2024 सुयोग्य व्यासपीठ असल्याचे प्रधान यांनी यावेळी नमूद केले. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण करून प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक स्तरावर देशाचे स्थान उंचावल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विकासाचे गुजरात मॉडेल, विकसित भारत @2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यांच्या कौशल्यविषयक प्रयत्नांमध्ये  मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.  शिक्षण आणि कौशल्य परिसंस्थेतील एनईपीप्रणीत  समन्वय देशाच्या  युवा शक्तीला  भविष्यासाठी सज्ज करेल, असे ते म्हणाले.

लोकसंख्या, मागणी आणि निर्णायक सरकार हे भारताच्या काळाचे कसे महत्त्वपूर्ण घटक ठरले आहेत,यावर प्रधान यांनी भर दिला. भारतातील स्टार्ट-अप आणि नवोन्मेष  संस्कृतीने देशाला ज्ञान आणि कौशल्यांचे केंद्र बनवले आहे, असेही ते म्हणाले.

जगाच्या बहुतांश भागातील  लोकसंख्या झपाट्याने वृद्ध होत असताना  भारत आपल्या युवापिढीमुळे  सक्षम आहे,असे त्यांनी नमूद केले. वर्ष 2047 पर्यंत ‘विकसित भारताचे' उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने, विशेषतः तरुणांनी योगदान दिले पाहिजे, असेही प्रधान म्हणाले.

आज, जागतिक आव्हानांवर किफायतशीर, दर्जेदार, शाश्वत आणि सुयोग्य उपाय देण्यासाठी जग भारताकडे पाहत आहे, असे प्रधान म्हणाले.

पार्श्वभूमी

व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेची संकल्पना  2003 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली तयार झाली. सर्वसमावेशक वृद्धी आणि शाश्वत विकासासाठी व्यावसायिक सहयोग, ज्ञानाचे आदानप्रदान  आणि धोरणात्मक भागीदारीसाठी सर्वात प्रतिष्ठित जागतिक मंच म्हणून ही परिषद उदयाला आली. गुजरातमधील गांधीनगर येथे 10 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान दहाव्यांदा ही परिषद आयोजित केली जात आहे. या वर्षीच्या शिखर परिषदेला  34 भागीदार देश आणि 16 भागीदार संस्था लाभल्या आहेत.


N.Chitale/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1995265) Visitor Counter : 127